Pune Crime | भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यावर बेटींग घेणारा पुनित जैन गुन्हे शाखेकडून गजाआड, पावणे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | भारत (India) विरुद्ध दक्षिण आफ्रिका (South Africa) एकदिवसीय क्रिकेट सामन्यावर (ODI Cricket) ऑनलाइन बेटींग (Online Cricket Betting) घेणाऱ्या एकाला गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभाग आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून अटक (Pune Crime) केली. अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीकडून 2 लाख 78 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी (दि.23) खडकी येथील चंदन हॅन्डलुम्स (Chandan Handloom Khadki) या कापड दुकानात करण्यात आली. पुनित चंदनमल जैन Punit Chandanmal Jain (वय-36 रा. फ्लॅट नं. 103, बी विंग, मेहता टॉवर्स, के.जे. रोड, खडकी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी विरुद्ध खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

रविवारी केपटाऊन (Cape Town) येथे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या दोन संघामध्ये एकदिवसीय क्रिकेट सामना झाला. या सामन्यावर खडकी येथील चंदन हॅन्डलुम्स कपड्याच्या दुकानात ऑनलाइन बेटिंग सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. (Pune Crime)

पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणावरुन माहीती प्राप्त केली. त्यानंतर गुन्हे शाखा आणि सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकांनी छापा टाकला. त्यावेळी आरोपी पुनित जैन हा त्याच्या मोबाईल मधील व्हॉट्सअॅप वर क्रिकेट मॅच व खेळीकडून बेटिंगची आकडेवारी घेताना आढळून आला. पोलिसांनी घेतलेल्या झडतीमध्ये 2 लाख 68 हजार रुपये रोख आणि 10 हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल असा एकूण 2 लाख 78 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने (Senior Police Inspector Arvind Mane) करीत आहेत.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge) यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके (PSI Sridhar Khadke),
पोलीस नाईक माने, चव्हाण, कोळगे, गुन्हे शाखा युनिट दोनचे (Crime Branch Unit 2) पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील (Police Inspector Krantikumar Patil), पोलीस हवालदार जाधव, तारु, युनिट 4 (Crime Branch Unit )
च्या महिला सहायक पोलीस निरीक्षक शोभा क्षीरसागर (API Shobha Kshirsagar),
पोलीस हवालदार शेख, कुवर, दरोडा व वाहन चोरी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक पडवी,
खंडणी विरोधी पथक 2 (Anti Extortion Cell) चे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण (PSI Shrikant Chavan) यांनी केली.

Web Title : Pune Crime | Punit Chandanmal Jain, who was betting on South Africa match against
India, was arrested pune police crime branch seized Rs 3 lakh from him

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Skin Care Tips-Raw Milk | जर हवा असेल क्लिअर आणि चमकदार चेहरा वापरा कच्चे दूध

Heart Patients Winter । हिवाळ्यात हृदयाच्या आजाराकडे दुर्लक्ष करू नका, ‘या’ गोष्टींची घ्या विशेष काळजी

Mother And Son Dance Video | आई-मुलाच्या जोडीने उडवली खळबळ,
‘नाच मेरी रानी’ गाण्यावर डान्स पाहून नोरा फतेहीला देखील पडेल भुरळ

Priyanka Chopra | प्रियांका चोप्रा होणार आई, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर

Pushpa Movie Mistakes | ‘पुष्पा’च्या सीनवर जिथे टाळ्या वाजल्या, तिथे झाली एवढी मोठी चूक,
अल्लू अर्जुनच्या चित्रपटात झाल्या ‘या’ 5 मोठ्या चुका

Ilena D’Cruz Oops Moment | ट्रान्सपरंट ड्रेस परिधान केल्याने इलयाना डीक्रूझ झाली ‘Oops Moment’ची शिकार