Pune Crime | ‘आम्ही कुदळवाडीचे भाई आहोत, आमच्या नादाला लागला तर तुझी गेम करतो’; पिंपरी चिंचवडमध्ये भाईगिरीतून 2 गटात तुफान राडा

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | आम्ही भाई आहोत, आमच्या नादाला लागला तर गेम करतो तसेच आमच्या एरियात तुम्हाला माझी दहशत दाखवतो, असे म्हणत धमकी (Threat) दिली. तसेच दोन गटांत तुफान राडा झाला. रॉड, कोयता, चाकूने वार करण्यात आले. गर्दी मारामारी करुन खुनी हल्ला केल्याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात (Chikhali Police Station) 13 जणांवर परस्पर विरोधात गुन्हे (FIR) दाखल करण्यात आले आहेत. हा प्रकार चिखली (Pune Crime) येथील पवारवस्ती येथे सोमवारी (दि.16) रात्री बारा ते सव्वाबाराच्या सुमारास घडला.

 

राहुल रमेश रेड्डी Rahul Ramesh Reddy (वय – 18 रा. कासारवाडी), गणेश पवार Ganesh Pawar (रा. पवारवस्ती, चिखली) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी राहुल रेड्डी याने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गणेश चंद्रकांत सिंगुलवार Ganesh Chandrakant Singulwar (वय – 21 रा. कुदळवाडी, चिखली) याला अटक (Arrest) केली आहे. त्याच्यासह कमलेश क्षीरसागर (Kamlesh Kshirsagar), दानेश (Danesh), आदित्य पुजारी (Aditya Pujari), सिराज अन्सारी (Siraj Ansari), बाजीराव मिसाळ (Bajirao Misal), अक्षय शेडगे Akshay Shedge (रा. कुदळवाडी, चिखली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोमवारी रात्री त्यांचा मित्र गणेश पवार याच्या दुकानात कपडे खरेदी करण्यासाठी गेले होते. कपडे खरेदी करुन रात्री उशिरा ते दुकानातून पायी घरी निघाले होते. त्यावेळी आरोपी एका रिक्षातून आले. गणेश पवार सोबत पूर्वी झालेल्या वादाच्या कारणावरुन कमलेश क्षीरसागर याने गणेश याला धमकावले. का रे तुला मस्ती आली का. तू भाई झाला का, असे म्हणत रॉडने गणेशला मारले. आम्ही कुदळवाडीचे भाई आहोत, आमच्या नादाला लागला तर तुझी गेम करतो, असे म्हणत दानेश याने गणेशला शिवीगाळ करुन मारहाण (Beating) केली. फिर्यादी हे भांडण सोडवण्यासाठी गेले असता सिराज अन्सारी याने त्याच्याकडील चाकूने फिर्यादीवर वार करत खुनी हल्ला केला, असे फिर्यादीत नमूद केले आहे.

याच्या परस्पर विरोधात गणेश चंद्रकांत सिंगुलवार याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार गणेश पवार, नन्या पवार (Nanya Pawar), वृषभ मांडके (Vrishabh Mandke), घनश्याम यादव उर्फ बंटी, राहुल मेड्डी (Ghanshyam Yadav alias Bunty), ओंकार आंग्रे Omkar Angre (सर्व रा. कुदळवाडी चिखली) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे मित्र फिर्यादीच्या रिक्षामधून जात होते.
त्यावेळी आरोपी गणेश पवार हा रस्त्याने जाताना दिसल्याने कमलेश क्षीरसागर याने रिक्षा थांबवण्यास सांगितले.
दानेश व कमलेश हे दोघेजण रिक्षातून उतरुन गणेश पवार याच्याकडे गेले.
तुमच्या एरियात आल्यावर मला ढोस देता का, आता तुम्ही माझ्या एरियात आला आहे.
आत्ता तुम्हाला दाखवतो माझी दहशत कशी आहे, असे म्हणून गणेश याने दानेशला मारहाण केली.
त्यानंतर गणेश याने त्याच्या पाच साथिदारांना बोलावून फिर्यादी आणि मित्रांना चाकू, कोयत्याने मारले.
दगड व सिमेंटचे ब्लॉक फिर्यादी यांच्या रिक्षावर मारुन रिक्षाचे नुकसान केले.

आता तुम्हाला दाखवतो, आमच्या भाईला नडता काय ? तुमचा माज उतरवतो,
असे म्हणत वृषभ मांडके आणि घनश्या यादव यांनी त्यांच्या हातातील कोयते हवेत फिरवले.
ते पाहून फिर्यादीचे मित्र हे तेथून पळून गेले. यानंतर फिर्यादीचा मित्र कमलेश क्षीरसागर याला शोधत आरोपी त्याच्या घरी गेले.
त्याच्या घराच्या दरवाजावर कोयते मारले तसेच गाडीवर कोयते मारुन गाडीची तोडफोड (Vandalism) केली.
आमच्या नादाला लागला तर एकएकांना कापून टाकीन, अशी धमकी दिली. कमलेशच्या आईला दमदाटी केली.
कुठे आहे तुझा मुलगा, घरात लपून बसला आहे काय, काढ त्याला बाहेर, त्याचा तुकडाच पाडतो, अशी धमकी आरोपींनी दिली,
असे फिर्यादीत नमूद केले आहे.

 

 

Web Title :- Pune Crime | quarrel in two groups from the fraternity killer attack with a machete knife pimpri chinchwad of pune crime news

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा