Pune Crime | पुण्यात डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय गर्भपाताच्या गोळ्या विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; दोघा मेडिकल दुकानदारांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | गर्भपाताच्या गोळ्या डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय (Prescription) विकता येत नाहीत, असे असतानाही बेकायदेशीरपणे गर्भपाताच्या (Abortion Illegal) गोळ्या विकणार्‍या एका मेडिकल दुकानातील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. अविनाश गव्हाणे Avinash Gavhane (वय २३, रा. वाघोली) आणि विकास रोकडे Vikas Rokde (वय ३४, रा. खराडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ही घटना जुना मुंढवा रोडवरील (Mundhwa Road) लाईफ स्टाईल फार्मामध्ये (Lifestyle Farma) घडली आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी अन्न व औषध विभागाचे औषध निरीक्षक विवेक खेडकर (Foods And Drugs Officer Vivek Khedkar) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandan Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय गर्भपाताच्या गोळ्यांची (Abortion Tablets) विक्री करण्यास बंदी आहे. असे असताना लाईफ स्टाईल फार्मामध्ये बेकायदेशीरपणे गोळ्या विकल्या जात असल्याचे अन्न व औषध विभागाला माहिती मिळाली होती. त्यानुसार गर्भपातावरील गोळ्या विकत घेण्यासाठी एक बनावट ग्राहक पाठविण्यात आला.

 

त्यानंतर अन्न व औषध प्रशासन, महापालिका (Pune Corporation) व पोलीस (Pune Police) यांनी एकत्रितपणे या दुकानावर छापा घातला. त्यात या दुकानात गर्भपातावरील गोळ्यांचे दोन स्ट्रिप आढळून आल्या. त्या त्यांनी कोंढवा (Kondhwa) येथून आणल्याचे सांगत आहे. चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल जाधव (Senior Police Inspector Sunil Jadhav) अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Racket selling abortion pills without doctor’s prescription exposed in Pune; Two medical shopkeepers arrested

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा