Pune Crime | पालखीला खांदा देण्याच्या मानावरुन जांभुळवाडीत दोन गटात तुंबळ हाणामारी आणि राडा ! 12 जणांवर गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  Pune Crime | जांभुळवाडी गावातील (Jambhulwadi) बापुजी बुवा देवाची पालखी (Bapuji Buva Devachi Palkhi) सोहळ्यात पालखीला खांदा लावू न देण्यावरुन दोन गटात जोरदार हाणामारी (Pune Crime) झाली असून दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध तक्रारी दाखल केल्या आहेत. भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police) दोन्ही गटातील १२ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी  अजय श्रीहरी जांभळे (वय २८, रा. जांभुळवाडी, आंबेगाव खुर्द) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ३०३/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पप्पु ऊर्फ रोहीत जांभळे, रोशन जांभळे (वय २८), योगेश बाळकृष्ण जांभळे (वय ३८), पृथक संपत जांभळे, विशाल बाळकृष्ण जांभळे, धिरज बाळकृष्ण जांभळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून धिरज जांभळे याला अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे नातेवाईक असून जांभुळवाडी गावातील बापुजी बुवा देवाची पालखी सोहळा ७ मे रोजी रात्री साडेदहा वाजता होता. पालखी सोहळा चालू असताना आरोपी यांनी फिर्यादी अजय यांना पालखीला खांदा लावू न देता शिवीगाळ केली. तसेच योगेश जांभळे याने फिर्यादी यांच्या डोक्यात दगड करुन जखमी केले. तुम्ही वाडीवाल्याना पालखीला खांदा देण्याचा अधिकार नाही. तुम्ही इथून सुटा नाही तर तुम्हाला जड जाईल, अशी धमकी दिली. (Pune Crime)

पृथक जांभळे याने फिर्यादी यांच्या गळ्यातील ५ तोळ्याची चैन ओढून काढून घेतली.
पोलिसांनी बेकायदा जमाव जमवून गोंधळ घातल्याबद्दल गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक कर्चे तपास करीत आहेत.

याविरोधात  योगेश बाळकृष्ण जांभळे (वय ३७, रा. जांभुळवाडी) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ३०२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अमोल श्रीहरी जांभळे (रा. आंबेगाव खुर्द), अजय श्रीहरी जांभळे,
आदेश पांडुरंग जांभळे, अजय राजेंद्र जांभळे, किरण भगत, अजिजित राजुरकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे नातेवाईक आहेत.फिर्यादी व त्यांचा पुतण्या पृथक संपत जांभळे याचा आरोपी यांची जांभुळवाडी गावातील बापुजी बुवा देवाची पालखी चालू असताना  किरकोळ कारणावरुन वाद झाला. त्यात आरोपी यांनी फिर्यादी यांना हाताने व सुर्‍यासारख्या हत्याराने मारहाण करुन फिर्यादी यांच्या गळ्यातील १ तोळा वजनाची सोन्याची चैन व खिशातील १६ ते १७ हजार रुपये हिसकावून घेऊन नुकसान केले,
म्हणून गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक कवठेकर तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Rada Between Two Groups Jambhulwadi Bharti Vidyapeeth Police FIR On 12

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा