Pune Crime | दांडेकर पुल परिसरात दोन टोळक्यात राडा; 16 जण ताब्यात

पुणे : Pune Crime | जनता वसाहतीजवळील (Janata Vasahat, Pune) दांडेकर पुल (Dandekar Bridge) परिसरात दोन टोळक्यांमध्ये मध्यरात्री चकमक उडाली असून त्यात दोन्ही टोळक्यांनी परस्परांवर कोयत्याने वार केले. परिसरात लावलेल्या गाड्यांची तोडफोड केली. याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी (Dattawadi Police) दोन्ही गटातील 16 जणांना अटक केली आहे. (Pune Crime)

याप्रकरणी सपना सुरेश म्हस्के Sapna Suresh Mhaske (वय ३६, रा. सिद्धार्थ कंपनीजवळ, सिंहगड रोड) यांनी फिर्याद (गु. रजि. नं. २३७/२२) दिली आहे. यावरुन पोलिसांनी समीर हातांगळे, आकाश म्हस्के, ओंकार ओव्हाळ, मयुर पालखे, भैय्या पालखे, रोहित खडके, लल्या नायर, प्रथम हातांगळे, अमन झारेकर, यश ओमन (रा. महालक्ष्मी बिल्डिंग, दांडेकर पुल) यांना अटक (Arrest) केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रहात असलेल्या गल्लीमध्ये आरोपींनी विनाकारण येऊन फिर्यादी यांच्या घराचे दरवाज्यावर गुरुवारी रात्री साडेअकरा वाजता कोयते मारुन नुकसान केले. त्याचा जाब विचारला असता त्यांनी फिर्यादी यांना कोयता दाखवून तुला संपवून टाकतो, असे म्हणून हातातील कोयता फिर्यादीस मारला. फिर्यादी या खाली वाकून समीर हातांगळे याला ढकलले व दरवाजा लावून घेतला. तेव्हा या टोळक्याने फिर्यादी व शेजारी राहणार्‍या चांदणबाई भालशंकर आणि सचिन रिठे यांच्या दरवाजावर कोयते मारुन दरवाजांचे नुकसान केले. जोरजोरात आरडओरडा करुन ‘‘तुझ्या परोला मारुन टाकतो. गोळ्या घालतो, त्याला जीवंत सोडणार नाही’’ असे बोलून धमकी देऊन दहशत निर्माण केली. (Pune Crime)

याविरोधात रोहित ईश्वर खडके (वय २३, रा. महालक्ष्मी अपार्टमेंट, सिंहगड रोड) याने दत्तवाडी पोलीस ठाण्यात (Dattawadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २३६/२२) दिली आहे.
त्यानुसार पोलिसांनी प्रथम ऊर्फ पॅडी सुरेश मस्के, राम मोहन बनसोडे, वैभव रवींद्र गोरड, अविनाश ऊर्फ अभि
अजय मिसाळ, गणेश जोरकर (रा. दांडेकर पुल), कृष्णा चंद्रकांत वाघमारे (वय २२, रा. सिंहगड रोड) यांना
अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकारानंतर प्रथम मस्के व इतरांनी जुन्या भांडणाच्या कारणावरुन
आरोपी महालक्ष्मी अपार्टमेंटमध्ये जाऊन रोहित खडके याला गाठले.
समीर हातागळे याचा साथीदार आहे, आज याला सोडून नका, याला आज एकदाचा संपवूनच टाकून असे म्हणून प्रथम
मस्के व त्याच्या साथीदारांनी कोयत्याने फिर्यादी यांच्या डोक्यावर वार केला.
तसेच महालक्ष्मी अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये असलेल्या गाड्यांवर कोयत्याने तोडफोड केली.
घराचे दरवाज्यांवर कोयत्याने वार करुन नुकसान केले.

पोलिसांनी दोन्ही गटावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन १६ जणांना अटक केली आहे.

Web Title :- Pune Crime | Rada in two gangs in Dandekar bridge area; 16 people detained crime news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Uddhav Thackeray | तुम्ही म्हणत होता ना सरकार पाडून दाखवा, आम्ही पाडले; आता बडबड बंद करा, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला