Pune Crime | बनावट ताडीसाठी लागणार्‍या वस्तुंची विक्री करणार्‍या 3 ठिकाणांवर छापा; दोघांना अटक करून 7 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  बनावट ताडी तयार करण्यासाठी लागणार्‍या साहित्याची विक्री करीत असलेल्या तीन ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने (state excise department) छापा टाकून दोघांना अटक (Pune Crime) केली आहे. मुंढवा आणि केशवनगर (keshav nagar mundhwa) येथे बुधवारी ही कारवाई (Pune Crime) करण्यात आली.

बनावट ताडी तयार करण्यासाठी लागणार्‍या विविध वस्तू आरोपींकडून जप्त करण्यात आल्या आहोत.
त्यांची किंमत सात लाख ३१ हजार रुपये आहे. छापा टाकल्यानंतर प्रल्हाद रंगनाथ भंडारी (वय ५७) आणि नरेंद्र भारत काळे (वय २५, रा. मुंढवा) यांना अटक करण्यात आली आहे.
तर उज्ज्‍वला प्रल्हाद भंडारी हिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत विभागातील एस. बी. हांडगर यांनी फिर्याद दिली आहे.

केशवनगर आणि मांजरी (Keshavnagar and Manjari) येथे बनावट ताडी तयार करण्यासाठी लागणार्‍या साहित्याची विक्री जात असल्याची माहिती विभागाला मिळाली होती.
त्यानुसार विभागाने बुधवारी ही कारवाई करण्यात आली. छाप्यात सॅक्रीन, सायट्रिक ॲसिड, तीन किलो क्लोरल हायड्रेड, तयार ताडी रसायने आणि एक चारचाकी जप्त करण्यात आली आहे.
भंडारी हा त्यांची पत्नी उज्‍ज्वला व चालक काळे यांच्या मदतीने या वस्तुंची विक्री करीत, असे फिर्यादीमध्ये नमूद आहे. आरोपींना अटक करून शुक्रवारी लष्कर न्यायालयात हजर करण्यात आले होते.
आरोपी नेमके कोणाला या वस्तुंची विक्री करीत, त्यांनी विकलेल्या वस्तुंमुळे कोणाच्या जीवास धोका निर्माण झाला आहे का? तसेच या गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी तसेच इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी अटक आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकील ॲड. संतोषकुमार पताळे (Government Advocate Adv. SantoshKumar Patale) यांनी केली होती.
त्यांची ही मागणी मान्य करीत न्यायालयाने आरोपींना २६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
विभागाचे निरीक्षक नंदकुमार जाधव (Inspector Nandkumar Jadhav) या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime | Raids at 3 locations selling counterfeit toddy items; Both were arrested and Rs 7 lakh was seized

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Rain | पुण्याच्या रास्ता पेठेतील केईएम हॉस्पीटलसमोर भरपावसात रिक्षावर झाड कोसळलं; चालकासह महिला जखमी (व्हिडीओ)

Pune Crime | पुण्यातील सायकलचोर ‘आशिक’ पोलिसांच्या जाळ्यात, कोरोनाकाळात केले ‘हे’ उद्योग, जाणून घ्या प्रकरण

Modi Government Schemes | मोदी सरकारच्या ‘या’ 12 योजना, ज्यांच्याद्वारे कर्जापासून उपचारापर्यंत मिळतेय लाखो रुपयांची मदत, जाणून घ्या