Pune Crime | जुगाराच्या अड्यावर पोलिसांचा छापा; 7 जणांवर FIR

पुणे / वालचंदनगर : पोलीसनामा ऑनलाइन –  पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) इंदापूर तालुक्यातील सणसर (Sansar Taluka Indapur) गावच्या हद्दीत नीरा डाव्या कालव्याच्या लगतच्या झाडाखाली सुरु असलेल्या जुगाराच्या अड्यावर (gambling dens) पोलिसांनी छापा (Police raid) टाकला. ही कारवाई सोमवारी (दि.25) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. वालचंदनगर पोलिसांनी (Walchandnagar police) केलेल्या या कारवाईत 7 जणांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला असून 1 लाख 8 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त (Pune Crime) केला आहे.

 

संतोष भिवा जाधव (वय-42), हनुमंत गोपाळ कुंभार (वय-34 दोघे रा. निंबोडी), दत्तात्रेय गुलाब निंबाळकर (वय-55), संजय बापु गर्जे (वय-26 दोघे रा. भवानीनगर), भगवान गजेंद्र आगरकर (वय-52 रा. बोरी), सोमनाथ प्रकाश जगताप, हनुमंत दादा धोतरे (दोघे रा. सणसर) यांच्यावर वालचंदनगर पोलीस ठाण्यात (Walchandnagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलीस नाईक विनोद पवार (Police Naik Vinod Pawar) यांनी फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सणसर गावच्या हद्दीमध्ये नीर डाव्या कालव्याच्या लगतच्या झाडाखाली तीन पत्ती नावाचा जुगार सुरु असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास छापा टाकून कारवाई केली. कारवाईमध्ये सात जण तीन पत्ती नावाचा जुगार खेळताना आढळून आले.
त्यांच्याकडून 28 हजार 760 रुपये रोख व 80 हजार रुपयांच्या दोन दुचाकी जप्त (Pune Crime) करण्यात आल्या आहेत.

ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक बिरप्पा लातुरे (API Birappa Lature), साहायक फौजदार शिवाजी निकम (PSI Shivaji Nikam), गोरख कसपटे, पोलीस हवालदार मोहन ठोंबरे,
गुलाब पाटील, विनोद पवार व किसन बेलदार यांनी केली. पुढील तपास पोलीस हवालदार गुलाब पाटील (Gulab Patil) करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | raids on gambling dens in sansar seven people charged by walchandnagar police

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

LIC Jeevan Umang | 1302 रुपये प्रीमियम देऊन मिळतील 27.60 लाख रुपये, जाणून घ्या या पॉलिसीबाबत सर्वकाही

Aryan Khan drugs case | कोण आहेत यास्मीन? समीर वानखेडे यांच्यासाठी ज्यांनी केला मंत्री नवाब मलिक यांच्यावर सर्वात मोठा ‘हल्ला’

NCB Officer Sameer Wankhede | आता ‘या’ तक्रारीमुळं समीर वानखेडेंच्या अडचणीत आणखी भर