Pune Crime | पुण्यातील धक्कादायक प्रकार ! जि. प. मधील अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये पडला नोटांचा पाऊस, ऑफीसरनं काढला पळ; कार्यालयात एकच खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | सरकारी कार्यालयातील काम करुन देण्यासाठी अधिकारी लाचेची (Bribe) मागणी करत असतात. मात्र, पुणे जिल्हा परिषदेच्या (Pune Zilla Parishad) समाजकल्याण विभागातील अधिकाऱ्याने (social welfare department) लाच घेण्यास नकार दिल्याने एका व्यक्तीने अधिकाऱ्याच्या कार्यालयात (cabin) पैसे उधळल्याचा प्रकार समोर (Pune Crime) आला आहे. या प्रकारामुळे घाबरलेल्या अधिकाऱ्याने कार्यालयातून पळ काढला. झालेल्या या प्रकारामुळे जिल्हा परिषदेत मात्र प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

पुणे जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी प्रवीण कोरंटीवार (Praveen Korantivar) यांच्या कार्यालयात हा प्रकार घडला. कोरंटीवार यांच्या केबीनमध्ये पैशांचा पाऊस पडल्याचे चित्र पहायला मिळाले. कोरंटीवार यांच्याकडे दलित वस्ती (Dalit settlement) संदर्भातील काम मंजूर करुन घेण्यासाठी शिरुर येथील एक व्यक्ती आली होती. त्यांनी लाच देण्याचा प्रयत्न केला. मात्र लाचेची रक्कम स्विकारण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला. त्यानंतर त्या व्यक्तीने अधिकाऱ्याच्या केबीनमध्ये पैसे उधळले. या प्रकारानंतर अधिकाऱ्याने तिथून पळ (Pune Crime) काढला.

घडलेल्या प्रकाराची जिल्हा परिषदेच्या वर्तुळात सकाळपासून जोरदार चर्चा रंगली आहे.
या प्रकाराबाबत कोरंटीवार यांना विचारले असता त्यांनी सांगितले, की दलित वस्तीचे काम मंजूर करुन घेण्यासाठी एक व्यक्ती माझ्या कार्यालयात आली होती.
त्यांनी मला लाच देण्याचा प्रयत्न केला. तुमचे काम करुन देतो, तुम्ही जा असे त्यांना सांगितले.
परंतु त्या व्यक्तीने माझ्या कार्यालयातच नोटा फेकल्या. घडलेल्या प्रकरानंतर पैसे फेकणाऱ्या व्यक्तीवर काय कारवाई होते, हे पहावे लागेल.

 

Web Title :- Pune Crime | rain of currency notes in cabin of a social welfare officer in pune zilla parishad office

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Anushka Sharma-Virat Kohli | अनुष्काचे फोटो पाहून नेटकऱ्यांनी केलं विराटचं कौतुक, जाणून घ्या कारण

Sharad Pawar | चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुंबईतील सर्व नियोजित कार्यक्रम सोडून शरद पवार दिल्लीला रवाना; राजकीय चर्चांना उधाण

JanDhan Account | खुशखबर ! जनधन खात्यात नसेल बॅलन्स तरीसुद्धा काढू शकता 10 हजार रुपये, जाणून घ्या कसे

PM Kisan | शेतकर्‍यांसाठी मोठी खुशखबर ! नवीन वर्षापुर्वीच मोदी सरकार देईल गिफ्ट, बँक अकाऊटमध्ये येतील 4000 रुपये

Conversion of Religion | धर्म परिवर्तन करणे, आंतरजातीय विवाह प्रमाणपत्र मिळवण्याचा आधार नाही : मद्रास हायकोर्ट

Shilpa Shetty | शिल्पा शेट्टीच्या ‘या’ मोहक अंदाजानं चाहत्यांचं जिंकलं मन, फोटो व्हायरल