Pune Crime | पावणे 10 कोटींचा अपहार केल्याप्रकरणी कोथरुड येथील लक्ष्मीबाई नागरी पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार यांना अटक, संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : Pune Crime | कोथरुड येथील लक्ष्मीबाई नागरी सहकारी पतसंस्थेत (Laxmibai Nagri Sahakari Patsanstha) पावणे दहा कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी आर्थिक व सायबर गुन्हे शाखेने (EoW Pune) चेअरमन राजेंद्र बाबुराव पवार (Rajendra Baburao Pawar) यांना अटक केली आहे. तसेच संचालकांवर एम पी आय डी अ‍ॅक्टनुसार फसवणुकीचा (Cheating Case) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

लक्ष्मीबाई नागरी पतसंस्थेच्या व्यवस्थापिका रंजना दीपक निकम, नियंत्रक अभिजित भोसले, नियंत्रक वैशाली पवार, संचालक चंद्रशेखर दिनकर देशमुख व इतर ६ संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

याबात अपर विशेष लेखापरिक्षक जे एस गायकवाड यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) फिर्याद २८०/२२) दिली आहे. हा प्रकार १  ऑगस्ट २०१५ ते ३१ मार्च २०२० दरम्यान घडला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मीबाई नागरी सहकारी पतसंस्थेचे विशेष लेखापरिक्षण करण्याचे आदेश सहकार विभागाने दिले होते. त्यानुसार लेखा परिक्षण करण्यात आले.

त्यात लक्ष्मीबाई नागरी पतसंस्थेतच्या २०१५ ते २०२० या कालावधीत संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी
संस्थेतील निधी हा अनामत खात्याद्वारे स्वत:च्या फायद्याकरीता संचालक मंडळाची मंजुरी न देता पदाचा
दुरुपयोग करुन घेतला. त्यासाठी इतरांनी पवार यांना मदत करुन या अपहारामुळे संस्था अडचणीत येणार असून
ही बाब निबंधक कार्यालयास कळविणे गरजेचे असताना सुद्धा कळविली नाही. तसेच नियंत्रक वैशाली पवार व
अभिजित भोसले यांनी संगनमताने बोगस कर्ज नावे टाकून अपहार करण्यात आला आहे.
दुबेरजी व्यवहाराने अनामत येणे, खात्याची बाकी कमी करुन कमी व्याज आकारुन अपहार करणे,
बँक उचल खात्यावर व्याज आकारणी न  करुन अपहार करणे, तारण कर्ज याद्वारे संस्थेतील रक्कमेचा अपहार करणे
अशा विविध प्रकारे गैरव्यवहार करुन ९ कोटी ७४ लाख ४० हजार १६९ रुपयांचा अपहार केल्याचे लेखा परिक्षणातून
आढळून आले. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक इंदलकर
तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Rajendra Pawar, chairman of Lakshmibai Nagari Sahakari Patsanstha in Kothrud, arrested for embezzlement of Rs 10 crore, case registered against director

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Meena Deshmukh | दुर्देवी ! ज्येष्ठ लावणी कलावंत मीना देशमुख यांचे अपघाती निधन

NCP MP Supriya Sule | महाराष्ट्रातील अस्मितेसाठी राजकारण बाजूला ठेऊन सर्व पक्षांनी एकत्र येऊन लढण्याची गरज – सुप्रिया सुळे