Pune Crime | ‘महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट अ‍ॅक्ट’खाली ‘सिद्धीविनायक’च्या राजेश साकला आणि वृषभ साकला यांच्यावर गुन्हा दाखल; 12 वर्षानंतरही नाही केले ‘हस्तातंरण’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट अ‍ॅक्टनुसार (maharashtra ownership of flats act) प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सदस्यांची सोसायटी स्थापन करुन त्याचे हस्तांतरण सोसायटीकडे करणे बंधनकारक असतानाही तब्बल 12 वर्षे  हस्तांतरण न केल्याने सिद्धीविनायक प्रॉपर्टीच्या (siddhivinayak properties) भागीदारांविरोधात कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police Station) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

सिद्धीविनायक प्रॉपर्टीचे (siddhivinayak properties) भागीदार राजेश कुमार नवपतलाल साकला Rajesh Kumar Sakla (वय 70, रा. कॅम्प) आणि वृषभ राजेश साकला Rushabh Rajesh Sakla (वय 41) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. (Pune Crime)

 

 

याप्रकरणी बाबुराव धायगुडे (वय ७४, रा. सनश्री एमरॉल्ड सोसायटी, कोंढवा खुर्द) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन भादंवि कलम IPC 406, 409 सह महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट अ‍ॅक्ट कलम 11, 13 (1) अन्वये गुन्हा (Pune Crime) दाखल करण्यात आला आहे.
बांधकाम व्यावसायिकाने प्रकल्प पूर्ण केल्यानंतर प्रकल्पातील सदस्यांची सोसायटीची स्थापना करायची असते. प्रकल्पातील जमीन, इमारतीचे सोसायटीकडे हस्तांतरण करावयाचे असते.

 

कायद्यानुसार बांधकाम व्यावसायिकाने हे करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
सिद्धीविनायक प्रॉपर्टीने कोंढवा खुर्द स. नं. 22 येथे मे 2008 मध्ये प्रकल्प पूर्ण केला.
त्यानंतर सोसायटीची स्थापनाही केली. मात्र, त्यानंतर प्रकल्पातील जमीन,
इमारतीचे सोसायटीकडे हस्तातंरण केले नाही. सोसायटीने अनेक वेळा विनंती करुनदेखील
तब्बल 12 वर्षे हस्तांतरण न केल्याने शेवटी सोसायटीच्या वतीने बाबुराव धायगुडे (Baburao Dhaygude) यांनी फिर्याद दिली आहे.

 

Web Title :- Pune Crime | Rajesh Kumar Sakla and Rushabh Rajesh Sakla of Siddhivinayak Properties have been charged under the Maharashtra Ownership Flat Act in Kondhwa Police Station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा