Pune Crime | कुख्यात गुंड पप्पू वाडेकर हत्या प्रकरणातील 7 आरोपींवर ‘मोक्का’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Crime | राजगुरुनगर (Rajgurunagar) येथील कुख्यात गुंड राहुल उर्फ पप्पू कल्याण वाडेकर (Pappu Wadekar murder case) यांच्या खुनातील 7 संशयित आरोपींवर मोक्का (MCOCA) Mokka लावण्यात आला (Pune Crime) आहे. या 7 संशयित आरोपींवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यामुळे आता त्या आरोपींना जामीन मिळणे कठीण होणार आहे. अशी माहिती खेड पोलीस ठाण्याचे पोलीस (Khed Police Station) निरीक्षक सतीश गुरव (PI Satish Gurav) यांनी दिली आहे.

11 जुलै रोजी पाबळ रस्त्यावर होलेवाडीजवळ पप्पू वाडेकर याचा रात्रीच्या सुमारास 10 जणांच्या टोळीने पिस्तुल. धारधार शस्त्र, आणि दगडांचा वापर करून खून (murder) करण्यात आला होता. तर, या प्रकरणात तौसिफ शेख, मिलिंद जगदाळे, विजय उर्फ बंटी जगदाळे, मयूर जगदाळे, जितेंद्र गोपाळे, प्रवीण उर्फ मारुती थिगळे व पवन थोरात हे 7 संशयित आरोपी अटकेत (Arrested) आहेत, तसेच तिघे फरार आहेत.

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (SP Dr. Abhinav Deshmukh) यांच्या आदेशावरुन खेडचे पीआय सतीश गुरव (PI Satish Gurav) यांनी या 7 आरोपींविरोधात मोक्का अधिनियम (Mcoca Act) 1999 चे कलम 23 (1) (अ) प्रमाणे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया (IG manoj lohiya) यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. लोहिया यांनी त्या प्रस्तावास मंजुरी दिली. सदर गुन्ह्यास मोक्का अधिनियम सन 1999 चे कलम 3 (1) (i) (ii),3 (4) प्रमाणे वाढीव कलम लावले आहे.

 

दरम्यान, खुन प्रकरणातील संशयित आरोपी तौसिफ शेख (Tousif Sheikh) याने संघटीत टोळी बनवली. त्यानंतर या टोळीची दहशत पसरवली.
तसेच त्याने खुद्द आणि टोळीच्या साथीदारामार्फत अनेक गुन्हे असल्याचे स्पष्ट झाले.
दहशतीचे वातावरण निर्माण करुन अनेक कारनामे सुरु ठेवले.
त्यामधून स्वत:चा आर्थिक फायदा करून घेत ऎश जीवन जगत असल्याचे समोर आले.
त्याचबरोबर त्याच्या अनेक कारनाम्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
खेड व आंबेगाव तालुक्यांत व परिसरामध्ये त्यांची दहशत निर्माण झाल्याचे तपासात खुलासा झाला आहे. दरम्यान, याप्रकरणी अधिक तपास पोलिस करीत आहेत.

 

Web Title : pune crime | Rajgurunagar pappu wadekar murder case arrested accuse mcoca pune rural police P Dr. Abhinav Deshmukh

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | शिरुरमध्ये मद्यपी एसटी बस चालक आणि वाहकाचं ‘डांगडिंग’,सर्वत्र खमंग चर्चेला उधाण; जाणून घ्या प्रकरण

Pune Crime | व्याज म्हणून दरमहा 50 हजार रुपये देत असतानाही बायका-मुलांना रस्त्यावर आणण्याची धमकी; पुण्याच्या कोंढव्यात तरुणाची आत्महत्या

Madras High Court | वाहन खरेदीदारांना मोठा दिलासा ! कार खरेदीवर पाच वर्षाची विमा सक्ती नाही – उच्च न्यायालय