Pune Crime | कारागृहातून जामीनावर सुटलेल्या सराईत गुन्हेगाराची पुण्यात रॅली, 14 जणांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  खुनाचा प्रयत्न (Attempt murder) केल्याच्या गुन्ह्यात कारागृहात असलेल्या आणि आज (शुक्रवार) जामीनावर सुटलेल्या (released on bail) सराईत गुन्हेगाराची पुण्यात (Pune Crime) रॅली (Rally) काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार पुण्यातील (Pune Crime) कर्वेनगर (Karve Nagar) परिसरात घडला असून आरोपींनी परिसरात दहशत निर्माण करत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी 14 जणांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे.

वैभव उर्फ पप्या उकरे, तुषार जावळकर, सूरज पवार, मयूर पवार, आकाश धोत्रे, मनोज दिघे, अमित नलावडे, विजू मोरे, योगेश पवार, स्वप्नील धोत्रे, सागर धोत्रे,
अजय धोत्रे, आशिष माळी, रोहित राठोड अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी पोलीस शिपाई विष्णू म्हातारमारे (Vishnu Mhatarmare) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव उकरे याच्या विरुद्ध एकाचा खुन करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station)
गुन्हा दाखल झाला (Pune Crime) होता. पोलिसांनी त्याला अटक करुन न्यायालयात हजर केले. न्यायालयाने (Court) त्याची रवानगी कारगृहात केली होती.
आरोपीला आज जामीन मंजूर झाल्याने तो कारागृहाबाहेर आला. त्यानंतर तो कर्वेनगरमधील वडार वस्ती परिसरात आला.

 

उकरे याच्या साथीदारांनी परिसरात दहशत पसरवण्यासाठी हातात तलवार, गज, काठ्या घेऊन दुचाकी रॅली (Bike rally) काढली.
याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी उकरे आणि त्याच्या साथिदारांना समज देत असताना त्यांनी पोलिसांना आरेरावीची करत शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली.
तसेच पोलिसांना या प्रकरणात पडू नका असे सांगितले.
त्यामुळे पोलिसांनी आरोपींविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणणे, दहशत पसरवल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जे.एन. होळकर (PSI J.N. Holkar) करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | rally in pune by Criminal who is on bail, FIR filed against 14 persons

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Mumbai Police Cyber Cell | मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडून CBI चे संचालक सुबोध कुमार जयस्वाल यांना ‘समन्स’

Pune Corporation | पुणे मनपा खाजगी जागेवरील लसीकरण केंद्रांचे स्थलांतर करणार ! लसीकरण केंद्रांवरील मंडप काढून टाकण्याचे आदेश

PM Kanya Ashirwad Yojana | सरकार पंतप्रधान कन्या आशीर्वाद योजनेंतर्गत मुलींना खरंच 2000 रुपये देत आहे का? जाणून घ्या सविस्तर