Pune Crime | पुण्यात पोलिस अधिकार्‍यावर खंडणीचा गुन्हा, प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – पुण्यातील (Pune Crime) मुंढवा पोलीस ठाण्याच्या (mundhwa police station) हद्दीतील हॉटेलमध्ये जाऊन पैशांची मागणी करणाऱ्या पिंपरी चिंचवड पोलीस (Pimpri Chinchwad) आयुक्तालयातील पोलीस उपनिरीक्षक मिलन कुरकुटे (PSI Milan Kurkute) याला निलंबित करण्यात आले आहे. कुरकुटे याने मुंढवा येथील हॉटेलमध्ये जाऊन कमिशनर ऑफिस मधून आल्याचे सांगून जबरदस्तीने पैसे घेतल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी कुरकुटे याच्यावर मुंढवा पोलीस ठाण्यात खंडणीचा (ransom) गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.24) रात्री 10.10 ते 10.30 या दरम्यान लोकल हॉटेल, वन लॉज हॉटेल, हॉटेल कार्टिव्हल, हॉटेल धमाका आणि हॉटेल मेट्रो या ठिकाणी घडला.

याप्रकरणी मारुती कोंडीबा गोरे (वय-31 रा. केदारेश्वर कॉम्प्लेक्स, मांगडेवाडी, कात्रज) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मारुती गोरे यांच्या फिर्यादीवरुन मुंढवा पोलिसांनी पोलीस उपनिरीक्षक मिलन कुरकुटे (वय-28) याच्या विरोधात आज (बुधवार) खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मिलन कुरकुटे हा पोलीस गणवेशात (police uniform) त्याच्या कारमधून (MH 33 V 1062) फिर्यादी मॅनेजर म्हणून काम करत असलेल्या हॉटेलमध्ये आला. त्याने मी कमिशनर ऑफिसमधून आल्याचे सांगून मोठमोठ्याने आरडाओरडा केला. तसेच हॉटेलवर कारवाई करण्याची धमकी देऊन फिर्यादी यांच्याकडून 2 हजार रुपयांची खंडणी उकळली. कुरकुटे एवढ्याच थांबला नाही तर त्याने हॉटेल वन लॉज (Hotel One Lodge) मधील मॅनेजर साहील पित्रे यांनाही धमकावून दोन हजार रुपये घेतले. यानंतर हॉटेल कार्निव्हल मध्ये जाऊन मॅनेजर किशोर छोटुमल थापा यांना धमकी दिली. थापा यांच्याकडून तीन हजार रुपये खंडणीस्वरुपात घेतले. कुरकुटे याने हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना कारवाई करण्याची धमकी देऊन 7 हजार रुपयांची खंडणी वसूल केली. पुढील तपास मुंढवा पोलीस करीत आहेत.

 

मिलन कुरकुटे तडकाफडकी निलंबित

लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक मिलन कुरकुटे (PSI Milan Kurkute) निलंबित (Police Suspended) करण्यात आले होते.
निलंबनाच्या (Police Suspended) कारवाईनंतर त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले होते.
सध्या कुरकुटे हे पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील (Pimpri Chinchwad Commissionerate)
नियंत्रण कक्षात सलग्न (Control Room) होते. मध्यंतरी ते आजारपणाच्या रजेवर गेले होते.
रजेवर असताना कुरकुटे यांनी पुण्यातील मुंढवा पोलीस ठाण्याच्या (mundhwa Police Station)
हद्दीतील हॉटेल व्यावसायिकांकडे पैशांची मागणी करुन 7 हजार रुपयांची खंडणी वसूल केली.
यासंदर्भात मुंढवा पोलिसांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना (Pimpri Chinchwad Police Commissioner) कळवल्यावर मिलन कुरकुटे याचे दुसऱ्यांदा निलंबित करण्यात आले.

Web Title : Pune Crime | Ransom case against police officer in Pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Corporation Amenity Space | अ‍ॅमेनिटी स्पेस दीर्घकाळ भाड्याने देण्याच्या प्रस्तावास राष्ट्रवादीचा ‘सशर्त’ पाठींबा; NCP च्या बदललेल्या भुमिकेमुळे महाविकास आघाडीतील अन्य पक्ष बुचकळ्यात (व्हिडीओ)

Amruta Fadnavis | अमृता फडणवीस यांची मुख्यमंत्र्यांवर अप्रत्यक्ष टीका; म्हणाल्या…

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 399 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी