Pune Crime | दुग्धव्यावसायिकाला खंडणी मागणाऱ्या विष्णु जाधव टोळीतील दोघांवर खंडणीचा गुन्हा; लोणी काळभोर पोलिसांची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे-सोलापूर महामार्गावरील (Pune-Solapur Highway) कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीत दुग्धव्यवसाय करणाऱ्या व्यक्ती व त्यांच्या दोन भावांना दोन लाखांची खंडणी (Ransom) मागितल्याचा प्रकार (Pune Crime) घडला होता. आरोपींनी जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणीची मागणी केली होती. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor police station) विष्णु जाधव टोळीतील (Vishnu Jadhav gang) दोघांवर गुन्हा (FIR) दाखल करुन अटक केली आहे. हि घटना 4 डिसेंबर ते 11 डिसेंबर या दरम्यान घडली आहे.

 

राजेंद्र उर्फ राजु विजय गायकवाड (रा. शिंदावणे ता. हवेली जि. पुणे), घनश्याम उर्फ गणेश आत्माराम शिंदे (रा. कुंजीरवाडी ता. हवेली, जि. पुणे) यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. याप्रकरणी अण्णासाहेब तानाजी खलसे Annasaheb Tanaji Khalse (रा. कुंजीरवाडी ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजू उर्फ राजेंद्र गायकवाड याने त्याच्या मोबाईलवरुन अण्णासाहेब खलसे यांना फोन करुन मोक्यातील (MCOCA) Mokka आरोपी विष्णु जाधव याचे नंबरकारी असल्याचे सांगून खलसे यांना जीवे मारण्याची धमकी देऊन दोन लाख रुपये खंडणी मागितली. त्यावेळी फिर्यादी यांनी पैसे देण्यास नकार दिला. मात्र तो वारंवार फोन करुन जीवे ठार मारण्याची धमकी देऊन पैशाची मागणी करत होता. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन आरोपींना बेड्या ठोकल्या. (Pune Crime)

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Joint Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण (Addl CP Namdev Chavan),
पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटील (DCP Namrata Patil),
सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई (ACPBajrang Desai),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी (Senior Police Inspector Rajendra Mokashi),
पोलीस निरीक्षक सुभाष काळे (Police Inspector Subhash Kale)
यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजु महानोर (API Raju Mahanor),
पोलीस हवालदार नितीन गायकवाड, पोलीस नाईक अमित साळुंके, श्रीनाथ जाधव, सुनिल नागलोत,
संभाजी देविकर, बाजीराव वीर, निखील पवार, शैलेश कुदळे, राजेश दराडे यांच्या पथकाने केली.

Web Title :- Pune Crime | ransom case against two members of Vishnu Jadhav gang who demanded ransom from a dairy trader; Loni Kalbhor police action

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Shama Sikander | शमा सिकंदरची चैन कोणीतरी करत होतं बंद, फोटोमध्ये दिसलं असं काही की, चाहते म्हणाले…

Aurangabad Crime | धक्कादायक ! कर्तव्य बजाविण्यास गेलेल्या पोलिस कर्मचार्‍याचा चक्क दोरीनं आवळला गळा (व्हिडीओ)

Immoral Relationship | अनैतिक संबंधातून जुन्या ‘भिडू’चा नव्या प्रियकराच्या मदतीनं काढला ‘काटा’, प्रेयसीकडून 42 वर्षीय बॉयफ्रेन्डची ‘गेम’; महाराष्ट्रातील घटना