Pune Crime | घरगुती सामान मुंबईला पोहचविण्यासाठी घेऊन मागितली खंडणी; सन लाईफ पॅकर्स अँड मुव्हर्स व धारेश्वर पॅकर्स अ‍ॅन्ड मुव्हर्सच्या मालकांविरूध्द गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यातून मुंबईच्या (Pune To Mumbai) घरी पोहचविण्यासाठी घरगुती सामान टेम्पोतून घेऊन जाऊन ते घरी पोहचविले नाही. टेम्पोचे लोकेशन हवे असेल तर 5 हजार रुपयांची अधिकची मागणी करुन पैसे दिले नाही तर सामानाचे नुकसान करु अशी धमकी देण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी (Mundhwa Police) सन लाईफ पॅकर्स अँड मुव्हर्स (Sun Life Packers And Movers) व धारेश्वर पॅकर्स अँड मुव्हर्सचे (Dhareshwar Transport Packers And Movers) मालकासह चार जणांविरुद्ध खंडणीचा (Ransom Case) गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे.

 

याप्रकरणी अभिनव अविनाश वर्मा (वय ३०, रा. केशवनगर, मुंढवा) यांनी फिर्याद दिली आहे.
त्यानुसार टेम्पोचालक रामदास शेलार (Ramdas Shelar), विजय पाटील (Vijay Patil),
अश्विन रघुनाथ रायकर (Ashvin Raghunath Raikar (वय २७, रा. धायरीगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अश्विन रायकर याला अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनव वर्मा यांनी त्यांचे घरगुती सामान मुंबईतील घरी हलविण्यासाठी सन लाईफ पॅकर्स अ‍ँड मुव्हर्स, धारेश्वर कार्गो पॅकर्स अँड मुव्हर्स (Dhareshwar Cargo Packers and Movers) यांना दिले.
त्यांनी २९ जानेवारी रोजी दुपारी चार वाजता केशवनगर येथील घरातून ९ लाख १० हजार रुपयांचे घरगुती साहित्य व दुचाकी टेम्पोत भरून घेऊन गेले़ दुसर्‍या दिवशी त्यांच्या मुंबईतील घरी साहित्य पोहचले नाही.
तेव्हा त्यांनी चौकशी करुन टेम्पो कोठे आहे, याची विचारणा केली.
तेव्हा टेम्पोचे लोकेशन पाहिजे असल्यास आणखी ५ हजार रुपये द्यावे लागेल.
पैसे दिले नाही तर सामानाचे नुकसान करु व तुमचे सामान विसरुन जा, अशी धमकी दिली.
त्यानंतर वर्मा यांनी मुंढवा पोलिसांकडे धाव घेतली (Pune Crime) आहे.
पोलिसांनी फसवणूक (Cheating Case) व खंडणीचा (Extortion Case) गुन्हा दाखल केला आहे.
मुंढवा पोलिस ठाण्याचे (Mundhwa Police Station) वरिष्ठ पोलिस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी (Senior Police Inspector Brahmanand Naikwadi)
यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक भोसले अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Ransom demanded for delivery of household goods to Mumbai Crimes against owners of Sun Life Packers & Movers and Dhareshwar Packers & Movers

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा