Pune Crime | व्यावसायिकास जीवे मारण्याची धमक्या देत उकळली दरमहा 10 लाखांची खंडणी; ‘इंडस’च्या सहा अधिकार्‍यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –   Pune Crime | डिझेलच्या वापराबाबतची नऊ कोटी रुपयांची थकबाकीचे दोन कोटींमध्ये तडजोड करत व्यावसायिकास जीवे मारण्याच्या धमकी (Pune Crime) दिल्या प्रकरणी इंडस टॉवर्स प्रा. लि. कंपनीमधील (Indus Towers Pvt. Ltd. Company) सहा जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला.

सुनील मनोहर मानकर (Sunil Manohar Mankar), संदीप ईश्वरचंद गौबा (Sandeep Ishwarchand Gauba), राजेश महेशचंद्र बन्सल (Rajesh Maheshchandra Bansal), तन्वीर सिंग प्रेमप्रकाश सरोहा (Tanveer Singh Premprakash Saroha), दिनेश एल अरोरा (
Dinesh L. Arora), अजय कुमार अरोरा (Ajay Kumar Arora) अशी आरोपींची नावे आहे. सर्व आरोपी इंडस कंपनीचे (Indus Towers Pvt. Ltd. Company) पदाधिकारी आहेत. याबाबत मुंढवा (Mundhwa) येथील 39 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. ऑगस्ट 2017 ते 22 जानेवारी 2021 दरम्यान राज्यभरात विविध ठिकाणी हा प्रकार घडला.

फिर्यादी यांच्या कंपनीची आरोपी कार्यरत असलेल्या इंडस टॉवर कंपनीकडे (Indus Towers Pvt. Ltd. Company) डिझेल पुरवठ्याची नऊ कोटी रुपयांची थकबाकी होती. त्याबदल्यात आरोपींनी दोन कोटी रुपयांमध्ये तडजोड केली. त्यानंतर फिर्यादींना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. तडजोडीवर बळजबरीने सह्या घेत पुढील तीन वर्षे काम कसे करावे, यांची अंडरटेकिंग घेऊन नंतर टर्मिनेशन नोटीस देवून दिशाभूल केली. तसेच कंपनीचे काम मिळण्यासाठी ऑगस्ट 2017 पासून डिसेंबर 2020 पर्यंत दर महिन्याला 10 लाख रुपये खंडणी घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

 

या प्रकरणात अटकपूर्व जामीन (anticipatory bail) मिळावा यासाठी बचाव पक्षाच्यावतीने अर्ज करण्यात आला. त्यास विशेष सरकारी वकील राजेश कावेडिया (Special Public Prosecutor Rajesh Kavedia) यांनी विरोध केला. यापूर्वी अंतरिम जामीन मंजूर केलेला असताना तपासासाठी ते पोलिसांकडे हजर राहिले नसल्याने त्यांनी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे. फिर्यादी दरमहा 15 लाख रुपयांची खंडणी देत नसल्याने कंपनीकडून दिल्या जाणा-‍या डिझेलमध्ये ऑक्टोंबर 2019 पासून कपात केली. त्यामुळे, फिर्यादी यांनी स्वत:कडील 9 कोटी रुपये डिझेलवर खर्च करून कंपनीच्या साइट सुरू ठेवल्या, असे अ‍ॅड. कावेडिया (Special Public Prosecutor Rajesh Kavedia) यांनी न्यायालयास सांगितले केली.

 

Web Title : Pune Crime | ransom of Rs 10 lakh per month for threatening to kill a businessman; Pre-arrest bail of six Indus Towers Pvt. Ltd. Company rejected

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pegasus Case | एनएसओ समूहासोबत कुठलाही व्यवहार झाला नाही; केंद्र सरकारने केलं स्पष्ट

PM-Kisan | मोठी खुशखबर ! 9.5 शेतकर्‍यांच्या खात्यात आला 9वा हप्ता, चेक करा तुमच्या अकाऊंटमध्ये आलेले पैसा?

MP Chhatrapati Sambhaji Raje | ‘दोन मिनिटांत महाराष्ट्र पेटवू शकतो, पण…,’ खा. संभाजीराजे भडकले (व्हिडीओ)

Pune Crime | जिल्हा न्यायालयाकडून अ‍ॅड. सागर ऊर्फ राजाभाऊ सुर्यवंशी फरार घोषित