Pune Crime | कोथरुड परिसरात दुकान चालविण्यासाठी दररोज 1 हजारांची खंडणी; कोयत्याचा धाक दाखवून गुंडांनी गल्ल्यातील रोकड नेऊन दुकानाचा बोर्ड जाळला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | दुकान चालवायचे असेल तर दररोज एक हजार रुपये (Extortion Money) हप्ता द्यावा लागेल (Hafta Wasuli), अशी धमकी देऊन कोयत्याचा धाक दाखवून गुंडांनी (Pune Criminals) गल्ल्यातील रोकड जबरी चोरी (Robbery) करुन नेली. तसेच जाताना दुकानाचा बोर्डही जाळल्याचा प्रकार कोथरुडमध्ये (Kothrud) घडला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी (Kothrud Police) यश तुपे, सोन्या पवार, अक्षय ऊर्फ ज्वाला येवले यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तिघेही पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार (Criminals On Pune Police Record) आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी सैबु सनवर शेख (वय ३४, रा. शिवसाई नगर, पौड रोड, कोथरुड) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. १४४/२२) दिली आहे. हा प्रकार सुतारदरा येथील पायल चिकन सेंटर मध्ये गुरुवारी सायंकाळी साडेसहा व रात्री नऊ वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे दुकानात असताना आरोपी तेथे आले.
“त्यांनी तुला दुकान चालवायचे असेल तर रोज १ हजार रुपये हप्ता द्यावा लागेल,” असे बोलून शिवीगाळ करुन “तू आमचे परिसरात कसा धंदा करतो बघतो,”
असे म्हणून फिर्यादीला मारहाण केली़ अक्षय येवले याने कोयता हवेत फिरवून दहशत निर्माण करुन ते निघून गेले.
या घटनेनंतर तिघे रात्री ९ वाजता पुन्हा आले.
त्यांनी शिवीगाळ करुन ड्रॉव्हरमधून १ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले.
जाताना दुकानाचे बाहेर लावलेला बोर्ड जाळून टाकून नुकसान केले. तसेच बाकीच्या दुकानदारांना कोयता दाखवून “हा फक्त ट्रेलर आहे.
तुम्ही जर रोज हप्ता दिला नाही तर पूर्ण पिक्चर दाखवितो,” असे म्हणून हवेत कोयता नाचवत दहशत निर्माण करुन ते निघून गेले. पोलीस उपनिरीक्षक कोकाटे तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Ransom of Rs.1000 per day for running a shop in Kothrud area; Fearing for their lives, the goons took cash from the street and set fire to the shop board

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rajya Sabha Election Results-2022 | ‘देवेंद्र फडणवीसांना माणसं आपलीशी करण्यात यश’ – शरद पवार

 

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

 

Rajya Sabha Election Results | राज्यसभेच्या निकालावरून संभाजीराजेंच्या समर्थकांचा शिवसेनेला जोरदार टोला; म्हणाले – ‘आता कसं वाटतंय, गार गार वाटतंय’