Pune Crime | बेकरी व्यवसायिकाला ठार मारण्याची धमकी देत खंडणी मागणाऱ्याला अटक

पुणे (Pune Crime) : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime |बेकरी व्यवसायिकाला ठार मारण्याची धमकी देत खंडणी (extortion) मागण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. खडक पोलिसांनी (Khadak Police) खंडणी मागणाऱ्याला अटक केली. ही घटना शुक्रवारी घोरपडे पेठ (ghorpade peth) येथे घडली आहे.

फारुख ऊर्फ गुड्डू युसुफ खान (वय 26, रा. घोरपडे पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पर्वती दर्शन येथील 26 वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फारूखने फिर्यादींच्या दुकानात जावून त्यांना मोठमोठ्याने शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तर 15 हजार रुपयांची खंडणीची मागणी केली. तसेच 2020 मध्येही आरोपीने फिर्यादींना अशाच प्रकारे जीवे ठार करण्याची धमकी देत खंडणी उकळली होती. अधिक तपास खडक पोलिस (Khadak Police) करत आहेत.

आतेभावाकडून अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने लैेंगिक अत्याचार

आतेभावानेच अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने लैेंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. बुधवार (दि.14) ही घटना घडली आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात (Lonikand Police Station) 30 वर्षीय व्यक्तीवर पोक्सोनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत अल्पवयीन मुलगी व आरोपी हे मुळचे उत्तरप्रदेशतील आहेत. अल्पवयीन मुलगी घरी एकटीच होती. यावेळी दुपारी साडे चारच्या सुमारास झोपली होती. त्यावेळी त्याने जबरदस्तीने शरिरसंबंध (physical relation) प्रस्थापित केले. मुलीने त्याला विरोध केला असता, कोणाला काही सांगितले तर तुला सोडणार नाही अशी धमकी देखील दिली. त्यानंतर पिडीत मुलीने झालेला हा प्रकार घरच्यांना सांगितला. त्यानुसार पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. अधिक तपास लोणीकंद पोलिस (Lonikand) करत आहेत.

हे देखील वाचा

SBI Alert | बँकेनं दिला सतर्कतेचा इशारा; आजच करून घ्या ‘हे’ काम, अन्यथा लागेल 10 हजार रुपये दंड

12345 number note | सुवर्णसंधी ! तुमच्याकडे असेल 12345 नंबरची एखादी नोट तर कमावू शकता 1-5 लाख रुपयांपर्यंत, चेक करा डिटेल्स

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | Ransom seeker arrested for threatening to kill bakery businessman

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update