Pune Crime | आत्येभावाकडून मामेबहिणीवर वेळोवेळी बलात्कार; नराधमाला 20 वर्षे सक्तमजुरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | चुलतीकडे सोडण्यासाठी जात असताना नराधम आत्येभावाने मामे बहिणीवर बलात्कार (Rape In Pune) केला. पीडित मुलगी गरोदर (Pregnant) राहिल्यानंतर हा प्रकार समोर आला. मात्र पीडित मुलगी फितूर झाल्याने डीएनए चाचणी (DNA Test) करण्यात आली. डीएनए चाचणीचा अहवाल सकारात्मक आल्याने वैद्यकीय पुराव्याच्या (Medical Evidence) आधारे मुलीवर अत्याचार (Pune Crime) झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणात आरोपी आतेभावाला विशेष न्यायाधीश एस.एस. गोसावी (Special Judge S.S. Gosavi) यांनी 20 वर्षे सक्तमजुरीची (Hard Labor) व 20 हजार रुपये दंडाची शिक्षा (Punishment) सुनावली.

 

दंडाची रक्कम पीडित मुलीला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त एक वर्षे कारावास (Imprisonment) भोगावा लागेल असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. ही घटना 2015 मध्ये वानवडी परिसरात घडली होती. आरोपीने चुलतीकडे सोडण्यास जाताना हांडेवाडी रोड (Handewadi Road) येथील सेनिंग पार्कच्या (Senning Park) कच्च्या रस्त्याने फिर्यादीस नेऊन जबरदस्तीने लैंगिक अत्याचार (Sexual Abuse) केले. त्यानंतर पीडितेला चुलतीकडे सोडले. अत्याचाराच्या चार महिन्यानंतर मासिक पाळी (Menstruation) न आल्याने पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यामध्ये ती चार महिन्याची गरोदर असल्याचे समोर आले. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) आरोपीविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला.(Pune Crime)

आरोपीला अटक करुन त्याच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र (Charge Sheet) दाखल करण्यात आले. या प्रकरणात सरकारी वकील अरुंधती ब्रम्हे (Advocate Arundhati Bramhe) यांनी काम पाहिले. त्यांनी सात साक्षीदार तपासले. यामध्ये डॉक्टर, सहायक रासायनिक विश्लेषक रोहन शिंदे (Assistant Chemical Analyst Rohan Shinde), तपासी अंमलदार राणी काळे (Investigating officer Rani Kale), पोलीस उपनिरीक्षक यांची साक्ष महत्त्वाची ठरली. न्यायालयीन कामकाजात पैरवी अधिकारी बी.एस. लोखंडे व हवालदार ए.एस गायकवाड यांनी सहकार्य केले.

 

Web Title :- Pune Crime | Rape Case Pune Criminal 20 Years Hard Labour Punishment

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar | अविनाश भोसलेंच्या अटकेचं मला काय माहिती, आता काय सीबीआयला विचारायला जाऊ? अजित पवारांचा खोचक सवाल

 

Pune PMC Tax | पुणे महापालिका ! पहिल्या 57 दिवसांत पालिकेच्या मिळकत कर विभागाचे 751 कोटी 31 लाख रुपयांचे उत्पन्न

 

Avinash Bhosale Arrest Case | अविनाश भोसले अटक प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश; CBI नं मागितली होती 10 दिवसांची कोठडी