Pune Crime | उरुळी कांचन परिसरात 17 वर्षाच्या मुलीवर बलात्कार; लोणीकाळभोर ठाण्यात जालन्याच्या अंबड तालुक्यातील युवकावर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | ऊस तोडण्यासाठी आलेल्या कामगाराच्या एका १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच मावस भावाने दोन वेळा बलात्कार (Rape in Pune) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी (Loni Kalbhor Police Station) एका तरुणावर गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

 

ही घटना उरुळी कांचन (Uruli Kanchan) येथील कॅनालच्या कडेला ऊसतोडी कामगारांच्या खोपीमध्ये ऑक्टोबर २०२१ मध्ये घडली आहे.
याप्रकरणी एका १७ वर्षाच्या मुलीने फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी जालना (Jalna District) जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील (Ambad Taluka) मालेगाव (Malegaon) येथे राहणार्‍या तरुणावर बलात्काराचा गुन्हा (Pune Crime)दाखल केला आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुलगी ही आपल्या आईवडिलांबरोबर ऊसतोडीसाठी उरळी कांचन येथे आली आहे.
उरुळी कांचन येथील कॅनालच्या कडेला पाल्यात ते राहतात.
ऑक्टोबर महिन्यात ही मुलगी खोपीमध्ये झोपली असताना तिच्या मावस भावाने तिला बाहेर बोलावून तिच्यावर दोन वेळा शारीरीक अत्याचार (Pune Crime) केले.
ही बाब आता तिच्या आईवडिलांना समजल्याने फिर्याद देण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक चौगुले तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Rape of 17 year old girl in Uruli Kanchan area FIR against youth from Ambad taluka of Jalna in Lonikalbhor police station

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा