क्राईम स्टोरीपुणे

Pune Crime | पुण्यातील संतापजनक घटना ! घरात घुसून 26 वर्षीय नवविवाहितेवर अत्याचार, प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यामध्ये (Pune Crime) महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. पुण्यातील पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) परिसरात एका 19 वर्षाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार (Gangrape) केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली असतानाच हिंजवडीमध्ये (Hinjawadi) एका महिलेच्या घरात घुसून लैंगिक अत्याचार (sexual assault) केल्याची घटना उघडकीस आली आहे. या धक्कादायक घटनेमुळे पुणे जिल्ह्यात (Pune Crime) खळबळ उडाली आहे. ही घटना मुळशी तालुक्यातील सुसगांव येथे गुरुवारी (दि.16) घडली आहे.

 

याप्रकरणी 26 वर्षीय पीडित महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi police station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी राजेंद्र नागनाथ जाधव (वय-40 रा.सुसगांव, मुळशी) याला अटक (Arrest) केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि.16) दुपारी 12.30 ते 12.50 या दरम्यान आरोपी राजेंद्र जाधव हा पीडित महिलेच्या घरात जबरदस्तीने घुसला. त्याने महिलेला ओढत दुसऱ्या खोलीत नेले व दरवाजा आतून बंद करुन तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार (Rape in Pune) केला. (Pune Crime)

 

पीडित महिलेने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करुन अटक केली.
पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक बोरकर (PSI Borkar) व पोलीस उपनिरीक्षक काकडे (PSI Kakade) हे करत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | rape of 26 year old woman in mulshi taluka of pune district one arrest

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Back to top button