Pune Crime | शिरूरमधील धक्कादायक घटना ! 8 नराधमांकडून महिलेवर बलात्कार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यातील शिरूर तालुक्यातील (Shirur) एक धक्कादायक घटना (Pune Crime) उघडकीस आली आहे. येथील 8 नराधमांनी एका 32 वर्षीय महिलेला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन बलात्कार (Rape in Pune) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या संतापजनक प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी 8 जणांवर शिरूर पोलीस ठाण्यात (Shirur Police Station) गुन्हा (FIR) दाखल झाला आहे.

 

याप्रकरणी माऊली पवार (Mauli Pawar), रज्जाक पठाण (Razzak Pathan), काळु वाळुंज (Kalu Walunj), विठ्ठल काळे (Vitthal Kale), राजेश उर्फ पप्पु गायकवाड (Rajesh alias Pappu Gaikwad), आकाश गायकवाड (Akash Gaikwad), संदीप वाळुंज (Sandeep Walunj), नवनाथ वाळुंज (Navnath Walunj) या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, 32 वर्षीय विधवा महिला, भोळसर व एकटी राहत असल्याचा फायदा घेऊन 1 एप्रिल 2021 ते 31 मे 2021 या दरम्यान घरामध्ये, उसाच्या शेतात, शाळेच्या पाठीमागे, नदीकिनारी अशा विविध ठिकाणी वेगवेगळ्या दिवशी नेऊन बलात्कार (Rape) केला आहे. महिलेला जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपींनी हे घृणास्पद कृत्य केल्याचे समोर आलं आहे. (Pune Crime)

 

दरम्यान, त्यानुसार या 8 आरोपींविरोधात शिरूर पोलीस ठाण्यात (Shirur Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 7 दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) दिली आहे.
याप्रकरणी अधिक तपास शिरूरचे पोलिस निरीक्षक सुरेश कुमार राऊत (Police Inspector Suresh Kumar Raut) यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक चरापले मॅडम (API Charapale Madam) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Rape of a woman by 8 men in shirur incident pune crime shirur police station

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा