Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | लग्नाचे आमिष (Lure of Marriage) दाखवून तरुणीवर बलात्कार (Rape) केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी (Pune Police) एकाला अटक (Arrest) केली आहे. साहील सत्यवान आल्हाट Sahil Satyawan Alhat (वय-22 रा. गांधीनगर, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत एका तरुणीने येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) फिर्याद (Pune Crime) दिली आहे.

 

पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपीवर गुन्हा (FIR) दाखल करून अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित तरुणी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. साहील याने तरुणी सोबत मैत्री करुन तिला लग्नाचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढले. त्याने पिडितेला नात्यातील एका महिलेच्या घरी नेऊन जबरदस्तीने बलात्कार केला. तरुणीने लग्नाबाबत त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची (Pune Crime) उत्तरे दिली.

 

आपली फसवणूक (Cheating) झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने येरवडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक केली.
साहील आल्हाट याला न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला पोलीस कोठडीत (Police Custody) ठेवण्याचे आदेश दिले.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गलांडे (PSI Galande) करीत आहेत.

 

 

Web Title : –  Pune Crime | Rape of a young woman by luring her for marriage

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा