Pune Crime | ‘माझे दाजी नगरसेवक आहेत, तुला अन् तुझ्या खानदानाला जगू देणार नाही’ ! धमकी देऊन 17 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | ‘माझे दाजी नगरसेवक आहेत, तुला आणि तुझ्या खानदानाला जगू देणार नाही’, असे धमकावून व ब्लॅकमेल करुन एका १७ वर्षाच्या युवकाने त्याच्याच वयाच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार (Rape Case) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर (Pune Crime) आला आहे.

 

याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार धायरी (Dhayari News ) येथे २० जून २०२० पासून आतापर्यंत सुरु होता. फिर्यादी यांच्या १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीची उत्तमनगर (Uttam Nagar News) येथील १७ वर्षाच्या मुलाबरोबर ओळख होती. त्याने या मुलीला धमकावून व ब्लॅकमेल (Blackmail) करुन तिच्यावर वारंवार बलात्कार केला. त्यानंतर ही मुलगी त्याच्याशी बोलत नव्हती. तेव्हा त्याने “तू ऐवढे दिवस माझ्याशी बोलली नाहीस तुला माझ्याशी बोलावेच लागेल. आपल्यात सर्व काही झालेले आहे. तुला माझ्याशीच लग्न करावे लागेल. नाही तर माझे दाजी नगरसेवक आहेत. तुला आणि तुझ्या खानदानाला जगू देणार नाही,” अशी धमकी दिली. या प्रकारानंतर तिने हे सर्व आपल्या आईला सांगितले. त्यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार (Pune Crime) दिली. पोलिसांनी या मुलाला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक तांदळे (API Tandale) तपास करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | Rape on 17 years old girl in sinhagad raod police station area

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा