Pune Crime | लग्नाच्या आमिषाने 25 वर्षीय तरुणीला लोणावळा, वडकी, भेकराईनगर येथील लॉजवर फिरवलं, केला बलात्कार ! ‘त्या’ गोळ्या देऊन ‘गर्भपात’ करणाऱ्या डॉक्टरासह दोघे ‘गोत्यात’

पुणे : Pune Crime | पहिले लग्न झाले असतानाही ते लपवून लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार केला. त्यातून ती गर्भवती राहिली असताना गोळ्या देऊन तिचा गर्भपात करणार्‍या डॉक्टरासह दोघांवर लोणी काळभोर पोलिसांनी (Loni Kalbhor Police) गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

आशिष शैलेश सपकाळ Aashish Shailesh Sapkal (वय ३४, रा. लोहगाव) आणि डॉ. दत्ता खैरनार Dr. Datta Khairnar (रा. धन्वंतरी हॉस्पिटल, धानोरी -Dhanwantari Hospital, Dhanori) अशी गुन्हा (Pune Crime) दाखल केलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी मांजरी (Manjari)येथील २५ वर्षाच्या तरुणीने फिर्याद दिली आहे. हा प्रकार सप्टेंबर २०२० ते जून २०२१ दरम्यान घडला होता. फिर्यादी आणि आरोपी सपकाळ हे ओळखीचे आहेत. सपकाळ याने आपले लग्न झाले असल्याचे लपवून फिर्यादी यांना लग्नाचे आमिष दाखविले. घरी सोडण्याच्या बहाण्याने त्यांच्यासोबत अश्लिल चाळे केले. तसेच लोणावळा (Lonavala), वडकी (Wadki), भेकराईनगर येथील लॉजवर नेऊन त्यांच्याशी शरीरसंबंध ठेवले. त्यातून त्यांना पावणे दोन महिन्यांच्या गरोदर राहिल्या असताना त्यांना गोळ्या देऊन डॉक्टरकडून गर्भपात (Abortion) करविला. तसेच फिर्यादी यांच्या सोबत शरीर संबंध ठेवतानाचे व्हिडिओ, फोटो फिर्यादीच्या परवानगीशिवाय काढले. फिर्यादी यांच्यासोबत लग्न न करता हे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. म्हणून फिर्यादीने तक्रार दिली असून ही फिर्याद वानवडी पोलिसांकडे (wanwadi police) वर्ग करण्यात आली आहे.

हे देखील वाचा

Pune ACP Transfers | पुण्यात नव्याने हजर झालेल्या ACP विजयकुमार पळसुले आणि ACP राजेंद्र साळुंके यांची ‘या’ विभागात नियुक्ती

Air Marshal V. R.Choudhary | ‘एअर मार्शल व्ही. आर. चौधरी’ होणार भारताचे नवे वायूदल प्रमुख

Anil Parab | अनिल परब यांच्याकडून दणका ! किरीट सोमय्यांच्याविरोधात 100 कोटींचा दावा

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | rape on 25 years old girl, aashish shailesh sapkal and dr datta khairnar booked

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update