Pune Crime | लग्न करतो, मुलालाही संभाळण्याचे आश्वासन देऊन 29 वर्षीय महिलेवर बलात्कार; पुण्याच्या हडपसर परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | तुझ्याबरोबर लग्न करतो. तुझ्या मुलाला वडिलांप्रमाणे सांभाळतो, असे आश्वासन देऊन महिलेवर वारंवार शरीर संबंध प्रस्थापित करुन फसवणूक करणार्‍यावर हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police Station) बलात्काराचा (Rape in Pune) गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे.

विरभद्र सुधाकर खरोसे Virbhadra Sudhakar Kharose (वय 37, रा. नांदेड फाटा, सिंहगड रोड- Sinhagad Road) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी फुरसुंगी (Fursungi News) येथील एका 29 वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. हा प्रकार 2018 पासून 10 ऑक्टोबर 2021 दरम्यान घडला आहे.

फिर्यादी या आपल्या मुलासमवेत फुरसुंगी येथे रहातात. विरभद्र खरोसे याने फिर्यादी यांना लग्नाचे आश्वास दिले. तुझ्या मुलाला वडिलांप्रमाणे सांभाळतो, असे सांगून विश्वास संपादन केला. वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन त्यांच्याबरोबर शारिरीक संबंध प्रस्थापित केले. फिर्यादी यांनी लग्नाबाबत वारंवार विचारणा केली. तेव्हा त्यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. आपली फसवणूक (Cheating Case) झाल्याचे लक्षात आल्यावर या महिलेने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली आहे. हडपसर (Hadapsar News) पोलिस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक खळदे (PSI Khalde) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Rape on 29 year old woman ; Incidents in Hadapsar area of ​​Pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्याच्या वारजे माळवाडीत सराईत गुन्हेगाराकडून तरूणावर कोयत्याने सपासप वार ! भरदुपारी घडलेली घटना, चौघांविरूध्द FIR

Pune Crime | ‘सेक्स’ करतानाचा नकळत काढलेला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार बलात्कार; पुण्याच्या कोंढव्यातील घटना

Chandrashekhar Bawankule | भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय ! काँग्रेस पुरस्कृत मंगेश देशमुख यांचा दणदणीत पराभव; महाविकास आघाडीची 49 मते फुटली