क्राईम स्टोरीपुणे

Pune Crime | चॉकलेटच्या आमिषानं 4 वर्षाच्या मुलीवर 12 वर्षाच्या मुलाकडून लैंगिक अत्याचार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Crime | पुणे आणि पिंपरी चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरामध्ये महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. यामध्ये लहान मुलींवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण जास्त आहे. अशा गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचे प्रमाण वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. अशीच एक घटना पुण्यातील (Pune Crime) पिंपरी चिंचवड शहरात घडली आहे. चॉकलेट देण्याच्या बहाण्याने 4 वर्षाच्या मुलीवर 12 वर्षाच्या मुलाने लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे.

 

हा प्रकार चिखली पोलीस ठाण्याच्या (Chikhali Police Station) हद्दीतील नेवाळे वस्ती येथे 15 नोव्हेंबर रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास घडला आहे.
याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने शनिवारी (दि.27) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद (Pune Crime) दिली आहे.
पोलिसांनी महिलेच्या फिर्यादीवरुन 12 वर्षाच्या मुलावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेवाळे वस्ती येथे आई-वडिल आणि पीडित वर्षाची चार वर्षाची मुलगी असे कुटुंब राहते.
ही मुलगी शेजारी राहणाऱ्या कुटुंबाच्या घरी खेळण्यासाठी गेली होती. त्यावेळी आरोपी 12 वर्षाच्या मुलाने पीडित मुलीला चॉकलेट आणण्यासाठी पैसे देतो.
असे आमिष दाखवले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक तौफिक सय्यद (API Tawfiq Sayed) करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | rape on 4 year old girl by 12 year old boy showing chocolate pimpri chinchwad area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Long Weekends 2022 | ‘या’ तारखांना येतील 2022 मधील ‘लाँग वीकेंड’, ऑगस्टमध्ये तर सुट्ट्याच-सुट्ट्या

Mouni Roy | मौनी रॉय झाली ‘Oops Moment’ची शिकार, बॅकलेस ड्रेस घालून कारमध्ये बसताना झाली कॅमेरामध्ये कैद..! पाहा व्हायरल व्हिडिओ

Juhi Chawla | जुही चावला शूटिंगमध्येच झाली होती गरोदर, चित्रपटाच्या सेटवरच गरोदरपणा मध्येही… 

Back to top button