Pune Crime | देवीचा प्रसादाच्या नावाखाली गुंगीचे औषध देऊन 16 वर्षाच्या मुलीवर बलात्कार; लोणीकंद परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | घरी आलेल्या नराधमाने 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला (Minor Girl) देवीचा प्रसाद म्हणून गुंगीचे औषध देऊन तिला बेशुद्ध (Unconscious) करुन तिच्यावर बलात्कार (Rape On Minor Girl In Pune) केला. या अत्याचारातून ही मुलगी गर्भवती (Pregnant) राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार सप्टेबर ते ऑक्टोबर 2021 मध्ये घडला (Pune Crime) होता.

 

या प्रकरणी या मुलीच्या आईने लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे पती हे कामासाठी सकाळी घराबाहेर जातात. त्यांची अकरावीत शिकणारी मुलगी एकटीच घरात होती. यावेळी एक जण त्यांच्या घरी आला. मुलीला एकटीला पाहून त्याने तिला देवीचा प्रसाद खायला दिला. प्रसाद खाल्यावर ही मुलगी बेशुद्ध पडली. त्यानंतर या नराधमाने तिच्यावर बलात्कार केला. (Pune Crime)

 

त्यानंतर आता या मुलीमध्ये शारीरिक बदल दिसू लागले. तसेच तिला त्रास होऊ लागल्याने तपासणी केली असता ती 30 आठवड्याची गर्भवती असल्याचे आढळून आले. त्यानंतर तिच्याकडे चौकशी केल्यावर हा प्रकार समोर आला. तिच्यावर ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) उपचार करण्यात येत असून पोलीस उपनिरीक्षक पवार (PSI Pawar) तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | Rape On Minor Girl In Lonikand Area Of Pune

 

Advt.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा