Pune Crime | पुण्यात ऑर्केस्ट्रामधील गायिकेवर लग्नाच्या आमिषाने लैंगिक अत्याचार; शारिरीक संबंधाचे फोटो-व्हिडिओ काढून धमकावत केला बलात्कार

पुणे / पिंपरी : Pune Crime | बँड व ऑर्केस्ट्रामध्ये गायिका म्हणून काम देऊन तिला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर वारंवार लैगिंक अत्याचार करुन त्याचे फोटो व व्हिडिओ काढून धमकावून पुन्हा अत्याचार (rape on orchestra singer) केल्याचा प्रकार समोर (Pune Crime) आला आहे.

याप्रकरण भोसरी पोलिसांनी (Bhosari Police Station) बाळु शिवाजी गव्हाणे Balu Shivaji Gavane (वय ५५, रा. लांडेवाडी झोपडपट्टी, भोसरी) याच्याविरुद्ध ३७६ व ५०६ कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका महिलेने (orchestra singer) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या बँड आणि ऑर्केस्ट्रामध्ये गायिका म्हणून काम करतात. त्यातून आरोपीशी त्यांची ओळख झाली.
आरोपीने त्यांच्याबरोबर फिर्यादीला गायिका म्हणून काम करण्यास घेतले.
त्यातून आरोपीबरोबर फिर्यादी यांची जवळीक वाढली. त्यानंतर ऑगस्ट २०१९ मध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलावून त्यांना हिंजवडी येथील एका लॉजवर नेले.
तेथे त्यांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्या इच्छेविरुद्ध, शारीरीक संबंध केला.

त्यावेळी त्याचे फोटो व व्हिडिओ काढले. त्यानंतर त्या आधारे फिर्यादीला बदनामी करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल (Blackmail) करण्यास सुरुवात केली.
हे व्हिडिओ व्हायरल (Video Viral) करण्याची धमकी (Pune Crime) देऊन त्याने फिर्यादी यांना अनेक वेळा अनेक लॉजवर व त्याच्या चिंचवड स्टेशन (Chinchwad Station) येथील कार्यालयामध्ये व हिंजवडी (hinjewadi pune) येथे नेऊन त्यांच्यावर बलात्कार (Rape) केला.
तसेच त्यांच्या पतीला जीवे मारण्याची धमकी (Pune Crime) दिली.
त्याच्या या त्रासाला कंटाळून शेवटी त्यांनी पोलिसांनी धाव घेतली.
भोसरी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन अधिक तपासासाठी तो हिंजवडी पोलिसांकडे (Hinjewadi Police Station) हस्तांतरीत केला आहे.

हे देखील वाचा

Mumbai Pune Expressway | मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर झालेल्या भीषण अपघात 3 ठार तर 6 जण जखमी; सहा वाहने एकमेकांवर आदळली

Post Office PPF | वर्षाला फक्त आणि फक्त 500 रुपयांनी सुरू करा आपलं अकाउंट, म्हातारपणात मिळवा पेन्शनचा ‘लाभ’, जाणून घ्या ‘या’ सरकारी स्कीमबाबत

Pune Crime | दुर्दैवी ! भाजीपाला विक्री करुन घरी परतणाऱ्या मायलेकरावर काळाचा घाला, कंटेनरखाली दबून दोघांचा मृत्यू

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | rape on orchestra singer in pune, criminals threatened by photo-video of physical relation

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update