Pune Crime | धक्कादायक! महिलेला कॉफीमधून गुंगीचे औषध देऊन बलात्कार, पुण्यातील खराडी परिसरातील घटना

पुणे: पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील खराडी भागात महिलेला कॉपी मधून गुंगीचे औषध देऊन बलात्कार (Rape) केल्याचे समोर (Pune Crime) आले आहे. भागीदारीत हॉटेल व्यवसायात करण्याच्या बहाण्याने आरोपीने महिलेला चर्चेसाठी घरी बोलावले होते. यावेळी तिला कॉफीतून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केले. याप्रकरणी पीडित महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) तक्रार (Pune Crime) दिली आहे.

या प्रकरणी अजयसिंग विजयसिंग ठाकूर Ajay Singh Vijay Singh Thakur (वय 31) याला पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकूर याची कोरोना काळात नोकरी गेली होती. तो नोकरीच्या शोधात असताना त्याची एका मित्राच्या मार्फत पिडीत महिलेशी ओळख झाली. यानंतर त्यांच्यातील ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. दोघांनी व्यवसायाबाबत चर्चा सुरू केल्या. फिर्यादी महिलेचा केटरिंगचा व्यवसाय होता. त्या दोघांनी हॉटेल सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. (Pune Crime)

यासाठी ठाकूरने महिलेला खराडी परिसरातील आपल्या घरी चर्चेसाठी बोलवले.
पीडित महिला आरोपीच्या घरी गेली असता त्याने कॉफीबाबत विचारणा केली.
त्यावेळी महिलेने कॉफीसाठी होकार दिला. ठाकूरने महिलेला कॉफीतून गुंगीचे औषध दिले. त्यामुळे महिला बेशुद्ध पडली. त्या दरम्यान आरोपीने महिलेवर बलात्कार केल्याचे समोर आले. हा प्रकार शुद्धीवर आल्यानंतर महिलेच्या लक्षात आला आणि तिने पोलिसांत धाव घेत आरोपीविरुद्ध तक्रार दिली.

Web Title :- Pune Crime | raped by giving drug in coffee incident in pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nilesh Rane | रत्नागिरी हातिवले टोल नाक्यावर निलेश राणे आक्रमक

Disha Salian Case | दिशा सालियन प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; अधिवेशनात फडणवीसांची घोषणा

IPS Rashmi Shukla | रश्मी शुक्ला प्रकरणावरून अजित पवार विधानसभेत आक्रमक