Pune Crime | अल्पवयीन मुलींचा बलात्कार करुन त्यांना केले गर्भवती; पुण्यात एका दिवशी दोन घटनांमध्ये दोन गुन्हे दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | प्रेमसंबंध निर्माण करुन लग्नाचे आमिष (Lure Of Marriage) दाखवून १३ व १७ वर्षाच्या मुलींबरोबर शारीरीक संबंध (Physical Relation) ठेवले गेले. त्यातून या अल्पवयीन मुली गर्भवती (Pregnant) राहिल्या असून अशा प्रकारे एकाच दिवशी दोन गुन्हे (Rape In Pune) दाखल करण्यात आले आहेत. (Pune Crime)

 

याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी (Lonikand Police) शरद चव्हाण (वय २२, रा. खराडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना वाघोली (Wagholi) येथे घडली आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्याद दिली आहे.

 

फिर्यादी यांची १७ वर्षाची मुलगी लहान असल्याचे माहिती असतानाही शरद चव्हाण याने तिला लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्या घरी येऊन तिच्याशी शारीरीक संबंध प्रस्थापित केले. त्यातून ही मुलगी ७ आठवड्याची गर्भवती झाली आहे. हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक पवार अधिक तपास करीत आहेत.

दुसरी घटना कोरेगाव पार्क (Koregaon Park) येथील मदारी वस्तीत (Madari Vasti, Pune) घडली आहे.
या वस्तीत राहणार्‍या एका १९ वर्षाच्या मुलाची पिडित १३ वर्षाच्या मुलीबरोबर गेल्या एक वर्षांपासून ओळख होती.
या मुलाने पिडित मुलीला माझे तुझ्यावर प्रेम आहे.
मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे, असे आमिष दाखवून त्याने तिच्याशी ४ ते ५ वेळा शारीरीक संबंध निर्माण केले.
या मुलीला त्रास होऊ लागल्याने ससून रुग्णालयात (Sasoon Hospital) तिला तपासणीसाठी नेण्यात आले होते.
तेव्हा ही मुलगी गर्भवती असल्याचे आढळून आले. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | Raped minor girls and made them pregnant Two cases were registered in two incidents in one day in Pune Koregaon Park Lonikand Police Station

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा