Pune Crime | मांजरीत मुलासोबत लिव्ह इनमध्ये राहणार्‍या तरुणीच्या नातेवाईकाने मुलाच्या आईवडिलांना केली बेदम मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | लिव्ह इनमध्ये (Live in Relationship) रहात असताना मुलाबरोबर झालेल्या भांडणाच्या कारणावरुन तिने व तिच्या नातेवाईकांनी मुलाच्या वडिलांसह नातेवाईकांना बेदम मारहाण (Beating) करण्याचा प्रकार मांजरी (Pune Crime) येथे घडला.

 

याप्रकरणी मांजरीतील महादेवनगर येथे राहणार्‍या एका 52 वर्षाच्या नागरिकाने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी माधुरी व तिची आई, वडिल, मनोज पाटील (Manoj Patil), आकाश राऊत (Akash Raut), रामदास लोहकरे Ramdas Lohkare (सर्व रा. हडपसर) यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांची पत्नी, दोन मुली व मुलासह मांजरीत गेल्या तीन वर्षापासून राहतात.
त्यांचा 23 वर्षाचा मुलगा खासगी वाहनावर चालक म्हणून काम करीत असून
तो गेल्या दीड वर्षापासून माधुरी या तरुणीबरोबर लिव्ह इनमध्ये रहात आहेत.
23 जून रोजी त्या दोघांमध्ये भांडणे झाल्याने माधुरी तिच्या माहेरी निघून गेली.
त्यांचा मुलगा कामाला गेला असताना शनिवारी मध्यरात्री सव्वाबारा वाजता माधुरी त्याचे आई वडिल व इतर नातेवाईकांना घेऊन फिर्यादी यांच्या घरी आली.

 

बोलायचे असल्याचे सांगून घरात शिरले. त्यांनी घरातील सर्वांना मारहाण केली.
त्यांच्या पत्नीच्या पोटात एकाने लाथ मारली. त्यांनी प्रतिकार केल्यावर त्यांना बेदम मारहाण केली.
त्यांच्या मुलीने भावाला बोलावून घेतले. पोलिसांना कळविले. तिचा भाऊ आला असताना त्यालाही त्यांनी मारहाण करुन ते कारमधून पळून गेले.
पोलीस उपनिरीक्षक शेळके (PSI Shelke) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Relatives of a young woman living in a live-in with a kitten beat the boy’s parents to death

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Political Crisis | देवेंद्र फडणवीसांचा फोटो शेअर करत भाजप नेत्याचं सूचक ट्विट; म्हणाले – ‘मी पुन्हा येईन…’

 

Income Tax Deductions | करदाते 8 लाख रुपयांपर्यंत वाचवू शकतात इनकम टॅक्स! जाणून घ्या

 

Blinkit सोबतच्या डीलनंतर Zomato च्या शेअरची स्थिती बिकट, 9 टक्केपेक्षा जास्त घसरून येथे पोहचला भाव