Pune Crime | पत्नी आणि सासरच्या लोकांकडून वारंवार पैशांची मागणी, वैतागून पतीने उचललं टोकाचं पाऊल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पत्नी आणि तिच्या माहेरच्या जाचाला कंटाळून पतीने राहत्या घरात गळफास (Hanging) घेऊन आत्महत्या केल्याची (Committed Suicide) धक्कादायक घटना पुण्यातील खडकी येथे घडली आहे. याप्रकरणी (Pune Crime) चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

समीर निवृत्ती नाईक Sameer Nivritti Naik (वय 38, रा. खडकी) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. नाईक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून पत्नी उषा, सासू, सासरे, मामा यांच्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. समीर यांचे वडील निवृत्ती भगवंत नाईक Nivritti Bhagwant Naik (वय 65, रा. चांभुर्डी, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) यांनी याबाबत खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

समीर खडकीतील दारुगोळा कारखान्यात (Khadki Ammunition Factory) कामाला होते.
समीर आणि पत्नी उषा यांना एक 12 वर्षाची मुलगी देखील आहे. मात्र गेल्या चार वर्षापासून उषा आणि तिच्या माहेरचे लोक समीरला वारंवार पैश्यांची मागणी करत होते.
यावरून त्यांच्यात वाद व्हायचे. समीरने पत्नीला दहा लाख रुपये दिले होते.
पत्नी आणि नातेवाईकांच्या मानसिक त्रासामुळे समीर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.
या प्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली होती.
समीरच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.
सहायक पोलीस निरीक्षक कदम (API Kadam) तपास करत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Repeated demand of money from wife and in-laws, extreme step taken by husband out of frustration

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Police – API Suspended | पुण्यातील महिला सहायक पोलीस निरीक्षक निलंबित, जाणुन घ्या कारण

Indrani Balan Winter T 20 League 2022 | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा

Jitendra Awhad | “राजीनामा माझ्या बापाकडे दिला आहे, आता पुढे ते ठरवतील” जितेंद्र आव्हाडांचे राहुल नार्वेकरांना प्रतिउत्तर

Afzal Khan Kabar | “ऐतिहासिक पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रतापगडावर अफजल खानाचा…” पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढाचें सचिवांना पत्र