पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहर (Pune Crime) आणि परिसरात सावकारी करुन पैसे उकळण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यासंदर्भात पोलिसांकडे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी संबंधित सावकारावर गुन्हे (FIR) दाखल केले आहेत. तर काही सावकारांना बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत. पुणे पोलिसांनी (Pune Police) मागील वर्षभरात 18 सावकारी (Lender) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नागरिकांना खासगी सावकाराविरुद्ध तक्रार करता यावी यासाठी पुणे पोलिसांनी 9145003100 हेल्पलाइन नंबर (Helpline number) सुरु केला आहे. त्यामुळे नागरिकांना या क्रमांकावर व्हॉट्सअॅप (WhatsApp) द्वारे तक्रार नोंदवता येणार आहे. (Pune Crime)
शहरात मागील वर्षभरात सावकारीच्या तक्रारीत वाढ झाली आहे. या माध्यमातून नागरिकांना दमदाटी करुन पैसे उकळण्यात येत आहेत. अशा प्रकारचे गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांनी विविध पथके तयार करुन कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. यानुसार शहरात 1 जानेवारी ते आजपर्यंत एकूण 18 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. महाराष्ट्र सावकारी कायदा कलम व भारतीय दंड विधान कलमांतर्गत ही कारवाई करण्यात येत आहे. (Pune Crime)
सावकाराकडून अधिकच्या पैशासाठी तगादा लावला जातो. सावकाराविरुद्ध तक्रार करण्यासाठी पुणे पोलिसानी व्हॉट्सअॅप नंबर सुरु केला आहे. या नंबरवर नागरिकांना घरबसल्या तक्रार करता येणार आहे. नागरिकांनी सावकारीसंदर्भात काही तक्रार असल्यास या नंबरचा वापर करावा असे आवाहन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी केले आहे.
परिमंडळ निहाय गुन्हे
1. परिमंडळ 2 – 2 गुन्हे दाखल
2. परिमंडळ 3 – 2 गुन्हे दाखल
3. परिमंडळ 4 – 1 गुन्हा दाखल
4. परिमंडळ 5 – 4 गुन्हे दाखल
5. गुन्हे शाखा – 9 गुन्हे दाखल
एकूण – 18 गुन्हे दाखल
Web Title :- Pune Crime | Report illegal money laundering on Pune Police WhatsApp Number! Helpline number issued by Pune Police Commissioner Amitabh Gupta
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- 9 Way to Secure Social Media Accounts | PM Modi यांचे Twitter अकाऊंट दुसर्यांदा हॅक ! 9 पद्धतीने केली जाऊ शकते हॅकिंग, प्रोफाईल ‘या’ पध्दतीनं ठेवा सुरक्षित, जाणून घ्या
- Amazon वर गांजा विक्रीच्या प्रकरणी SIT स्थापन, CAIT ने केले स्वागत
- Esha Gupta | ईशा गुप्ता ‘फॉर्म्युला 1’ बघायला जाताना विसरली अंतर्वस्त्रे, झाली Oops Moment ची ‘शिकार’