Pune Crime | धक्कादायक ! पत्नीसह सासू, मेहुण्यांनी केली बेदम मारहाण, निवृत्त सैनिकाचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यातील लोहगाव (Lohegaon Pune) परिसरामधील एक धक्कादायक घटना (Pune Crime) उघडकीस आली आहे. पत्नीला मारहाण केल्यामुळे पत्नीसह सासू, मेहुण्यांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याने निवृत्त सैनिकाचा मृत्यू (Died) झाल्याची घटना घडली आहे. ही घटना विमानतळ पोलिस स्टेशनच्या हद्दीत 11 जानेवारी रोजी घडली. या प्रकरणी पत्नीसह सासू आणि मेहुण्यांविरोधात गुन्हा (FIR) दाखल झाला आहे. प्रमोद रघुनाथ जाधव (Pramod Raghunath Jadhav) (वय 39) असे खून (Murder in Pune) झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

 

याबाबत माहिती अशी की, पत्नी ज्योती जाधव (Jyoti Jadhav), सासु सुषमा दळवी (Sushma Dalvi), आणि मेहुणे राकेश दळवी (Rakesh Dalvi), कैलास दळवी (Kailas Dalvi) यांच्याविरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. तर, मृत प्रमोद जाधव हे सैन्यदलातून निवृत्त झाले आहेत. लोहगाव परिसरात पत्नी आणि 2 मुलांसह ते राहत होते. प्रमोद जाधव यांना दारूचे व्यसन होते. दारू पिल्यानंतर तो पत्नीला मारहाण करायचा. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून पत्नी त्याच्यासोबत राहत नव्हती. (Pune Crime)

त्यानंतर 11 जानेवारी रोजी मुलांच्या शाळेसंदर्भातील काही कागदपत्रे घेण्यासाठी ज्योती जाधव या लोहगावमधील घरी आल्या होत्या.
यावेळी पुन्हा पती-पत्नी वाद झाला. त्यावेळी प्रमोदने पत्नीला बेदम मारहाण केली.
यात गंभीर दुखापत झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते.
रुग्णालयात ज्योती यांची आई आणि 2 मेहुणे आले होते.
त्यानंतर या सगळ्यांनी घरी जाऊन प्रमोद यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आणि निघून गेले.

 

प्रमोद हा गेली दोन दिवस घराबाहेर पडला नव्हता. त्यानंतर तो घरातच मृतावस्थेत आढळून आला. शवविच्छेदन अहवालात बेदम मारहाण झाल्याने त्याचा मृत्यू (Died) झाल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी अधिक तपास विमानतळ पोलिस (Vimantal Police) करीत आहेत.

 

Web Title :-  Pune Crime | retired soldier murder by wife mother in law and brother in law

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा