Pune Crime | किरकोळ वादातून रिक्षा चालक तरुणाचा निर्घृण खून, हडपसर परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | सकाळी झालेल्या वादातून रिक्षा चालक (Rickshaw Driver) तरुणाला दारु पिण्याच्या बहाण्याने बोलावून घेऊन दगडाने तसेच बांबुने मारहाण (Beating) करुन खून (Murder) केल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी हडपसर-माळवाडी येथील केशव चौकाजवळ असलेल्या नारळाच्या बागेजवळ घडली आहे. सागर राहुल गायकवाड Sagar Rahul Gaikwad (वय-24 रा. लक्ष्मी माता मंदीर, हडपसर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात (Pune Crime) घेतले आहे.

 

याबाबत अक्षदा प्रतिक वाघमारे Akshada Pratik Waghmare (वय-22 रा. शांतीनगर वसाहत, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. याप्रकरणी कृष्णा विठ्ठल रेखले Krishna Vitthal Rekhle (वय-27 रा. कवडापाट टोल नाका, लोणी काळभोर) याच्या विरोधात खुनाचा गुन्हा (FIR) दाखल करुन ताब्यात घेतले आहे. (Pune Crime)

 

आरोपी कृष्णा रेखले आणि मृत सागर गायकवाड हे दोघे रिक्षा चालवतात. रविवारी सकाळी दोघांची लोणी काळभोर येथील कवडीपाट टोल नाक्याजवळ बाचाबाची झाली होती.
त्यानंतर रेखले याने सागरला दारु पिण्याच्या बहाण्याने बोलवून घेऊन लाकडी बांबुने तसेच दगडाने तोंडावर मारुन खून केला.
सागर गायकवाड मृतावस्थेत सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस उपायुक्त नम्रता पाटील (DCP Namrata Patil),
सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई (ACP Bajrang Desai), पोलीस निरीक्षक गुन्हे दिगंबर शिंदे (Police Inspector Digambar Shinde)
यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी रेखले याला ताब्यात घेतले आहे.

 

Web Title :- Pune Crime | rickshaw driver murdered in hadapsar pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Champa singh Thapa | बाळासाहेबांच्या ‘सावली’नेही सोडली उद्धव ठाकरेंची साथ, ‘मातोश्रीचा सेवक’ शिंदे गटात

Pune News | अतिवृष्टी नुकसानीपोटी 3 कोटी 18 लाखांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त

CM Eknath Shinde | आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदार संघात नवरात्रोत्सवाच्या स्वागत कमानींवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बॅनर