Pune Crime | रिक्षा, दुचाकी चोरणारा सराईत गुन्हे शाखेकडून गजाआड; रिक्षासह 3 दुचाकी जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरातील (Pune Crime) विविध भागात रिक्षा (Rickshaw) आणि दुचाकी (Bike thieves) चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने (Pune Police Crime Branch) अटक (Arrest) केली आहे. त्याच्याकडून एक रिक्षा आणि तीन दुचाकी जप्त केल्या आहेत. ही कारवाई पुण्यातील (Pune Crime) भवानी पेठेतील संत राहिदास उद्यानाजवळ करण्यात आली आहे. बुऱ्हान सादिक शेख Burhan Sadiq Shaikh (वय-19 रा. गफुर तकीया, सहारा कॅम्प, घोरपडी पेठ पुणे) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.

 

गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मंगळवारी (दि.7) हद्दीत गस्त घालत असताना पोलीस अंमलदार अनिकेत बाबर (Aniket Babar) यांना माहिती मिळाली की, सराईत वाहन चोर भवानी पेठेतील राहिदास उद्यानाजवळ वाहन चोरी करण्याच्या उद्देशाने थांबला आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. त्याला युनिट कार्यालयात आणून सखोल चौकशी केली. (Pune Crime)

 

चौकशी दरम्यान आरोपीने त्याचा साथिदार मोसीन उर्फ मन्या अब्बास शेख Mosin alias Manya Abbas Sheikh (वय-30 रा. चाँद ताराचौक, गंजपेठ पुणे) याच्या मदतीने रिक्षा आणि दुचाकी चोरल्याची कबुली देऊन 1 लाख 5 हजार रुपये किंमतीची एक रिक्षा आणि तीन दुचाकी पोलिसांना दिल्या. पोलिसांनी जप्त केलेली रिक्षा आणि दुचाकी खडक (Khadak Police Station) आणि लष्कर पोलीस ठाण्याच्या (lashkar police station) हद्दीतून चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपी मोसीन शेख हा हद्दपार असून तो 14 नोव्हेंबर पासून येरवडा जेलमध्ये (Yerawada Jail) आहे. मोसीन शेख याच्यावर चेन स्नॅचींग, घरफोडी, वाहन चोरी असे 15 गुन्हे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल आहेत. (Pune Crime)

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता  (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -1 गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे (Senior Police Inspector Shailesh Sankhe),
पोलीस उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी (PSI Sunil Kulkarni), संजय गायकवाड, पोलीस अंमलदार अनिकेत बाबार,
सतीश भालेकर, राहुल मखरे, दत्ता सोनावणे, महेश बामगुडे, इम्रान शेख, अजय थोरात, अशोक माने, शशीकांत दरेकर,
अजय जाधव, अमोल पवार, तुषार माळवदकर यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Rickshaw, two-wheeler thief arrested by Sarait Crime Branch; 3 bikes with rickshaw seized

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यातील स्वारगेट परिसरातील अट्टल गुन्हेगार एक वर्षासाठी स्थानबद्ध, MPDA कायद्यान्वये पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची 48 जणांवर कारवाई

Pune News | थंडीत पुणेकरांचे मद्यप्रेम वाढले ! गतवर्षीपेक्षा यंदा मद्याची अधिक विक्री

Urfi Javed| पुन्हा उर्फीच्या हाॅट अदांनी लावलं लोकांना वेड, निळ्या बिकनीत उर्फीचा बोल्ड अंदाज

Indian Railway IRCTC | आता तुम्ही कोणत्याही स्टेशनवरून ट्रेनचा प्रवास सुरू करू शकता, फक्त ‘हे’ किरकोळ काम करावे लागेल