Pune Crime | महिलेची छेडछाड करणार्‍या रोड रोमिओला पोलिसांनी दाखविला हिसका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | परिसरात भाजी आणण्यासाठी जात असलेल्या महिलेकडे पाहून त्यांचे लक्ष वेधण्यासाठी मोठ्या मोठ्या आरडाओरडा करणे, शिट्ट्या वाजविणे, पाठलाग करुन त्रास देणार्‍या रोड रोमिओच्या (Road Romeo) पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. (Pune Crime)

 

तन्वीर लतिफ शेख Tanveer Latif Shaikh (वय ३०, रा. गंज पेठ) असे या रोडरोमियाचे नाव आहे. याबाबत एका ३३ वर्षाच्या महिलेने खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २९६/२२) दिली आहे. हा प्रकार १६ जुलैपासून सुरु होता. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या भाजी आणण्यासाठी जात असताना आरोपी शेख हा त्यांच्याकडे नजर रोखून पाहायचा.
तसेच त्यांचे लक्ष जावे यासाठी तो मोठ्याने ओरडायचा, शिट्टी वाजवायचा. तसेच फिर्यादीचे मागे मागे येत असे.
या सर्व प्रकारामुळे फिर्यादीचे मनास लज्जा उत्पन्न झाली. या सर्व प्रकाराने त्या घाबरुन गेल्याने त्यांनी सुरुवातीला तक्रार दिली नव्हती.
त्यामुळे शेख याचा त्रास आणखीच वाढला. तेव्हा त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.
पोलिसांनी रोडरोमिओ शेख याला अटक (Arrest) केली असून पोलीस उपनिरीक्षक पवार (Sub-Inspector of Police Pawar) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Road Romeo who molested the woman was shown by the police

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shivsena | शिवसेनेवर दावा सांगण्याचा उद्दामपणा शिंदेंचा नाही…हे भाजपचं कारस्थान; शिवसेनेने ‘रोखठोक’ सुनावले

Deepak Kesarkar | अशोक चव्हाणांच्या ‘त्या’ वक्तव्यावर केसरकरांचे स्पष्टीकरण, म्हणाले – एकनाथ शिंदे तेव्हा निर्णय प्रक्रियेतच नव्हते मग…

Maharashtra Congress | काँग्रेस आमदाराच्या दाव्याने खळबळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अब्दुल सत्तारांपासून धोका!