Pune Crime | कोथरुडमध्ये कारमधून आलेल्या चोरट्यांचा ‘रोड शो’, पार्किग केलेल्या गाड्यांमधून कार टेप व साऊंड सिस्टीमची चोरी

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –   पुणे (Pune Crime) आणि परिसरामध्ये लूटमार आणि घरफोड्यांचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. कोथरुडमध्ये एका कारमधून आलेल्या चोरट्यांनी रोड शो (Road show) करत पार्किंग केलेल्या गाड्यांमध्ये चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चोरट्यांनी रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या तब्बल 10 गाड्यांमधून कारटेप (Cartape) आणि साऊंड सिस्टीम (sound system) चोरून नेले. पुण्यात (Pune Crime) घडलेल्या या प्रकरामुळे मोठी खळबळ उडाली आहे. महत्त्वाचे म्हणजे हा प्रकार घडून दोन दिवस झाले तरी कोथरुड पोलिसांना (Kothrud police) चोरट्यांचा अद्याप थांगपत्ता लागलेला नाही. त्यामुळे परिसरात चोरीच्या घटना घडत असताना गस्त घालणारे पोलीस कोठे होते ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

याप्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud police station) कलम 379 व 427 नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. यबाबत सलीम शेख यांनी तक्रार दिली आहे.
हा प्रकार कोथरुडमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात गंनजय सोसायटीच्या समोर घडला आहे.
चोरट्यांनी कारची काच फोडून 15 हजार रुपये किंमतीचा इनबिल्ड कारटेप चोरून नेला.
चोरट्यांनी धिंगाणा घालत फिर्यादी यांच्यासह इतर 9 जणांच्या कारमधून कारटेप व साऊंड सिस्टीम चोरून नेली.

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) तपासले असता हे चोरटे अल्टो कारमधून (Alto car) आल्याचे समोर आले.
असे पोलिस निरीक्षक मेघश्याम डांगे (Police Inspector Meghshyam Dange) यांनी सांगितले. चोरीच्या या घटना वेगवेगळ्या परिसरात घडल्याचे डांगे यांनी सांगितले.
पुढील तपास कोथरुड पोलीस करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | ‘Road show’ of car thieves in Kothrud, theft of car tapes and sound systems from parked vehicles

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | BMW कार चालकाची अरेरावी, भररस्त्यात तरुणीला केली बेदम मारहाण

Excise Officer Suspended | राज्य उत्पादन शुल्क कार्यालयातील अधिकार्‍यासह 4 जण तडकाफडकी निलंबीत

Viral Video | ’तालिबान’ राजवटीत कॉमेडी करणे ’हराम’! गळा कापून कॉमेडियनची निर्घृण हत्या, व्हिडीओ वायरल