Pune Crime | 2 मेडिकल दुकानदारांना पिस्तुलाचा धाक दाखवून लुटले; हॉटेलमध्ये शिरुन जीवे मारण्याची धमकी देऊन लुबाडले, कोंढव्यातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मेडिकल दुकान उशिरापर्यंत उघडे असल्याचा गैरफायदा घेऊन दुकानात शिरुन दुकानदाराला पिस्तुलाचा धाक दाखवून लुबाडण्याच्या दोन घटना एकाच दिवसात कोंढव्यात (Kondhwa) घडल्या. तसेच त्याच चोरट्यांनी हॉटेलमध्ये शिरुन तेथील दोन कामगारांना जीवे मारण्याची धमकी देऊन लुबाडल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी दिलीप गेनाराम सावलेसा (वय २४, रा. कुल उत्सव सोसायटी) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. कोंढव्यात बुधवारी पहाटे पावणेतीन वाजता एका मेडिकल दुकानदाराला पिस्तुलाचा धाक दाखवून लुबाडण्याची घटना घडली होती. दिलीप सावलेसा यांचे कोंढव्यात जय अंबे मेडिकल अँड जनरल स्टोअर्स हे दुकान आहे. ते व त्यांचे वडिल हे रात्री साडेदहा वाजता दुकानात असताना मोटारसायकलवरुन दोघे जण आले. त्यांच्यातील एकाने पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांच्या दुकानातील गल्ल्यातील ८ हजार रुपये जबरदस्तीने चोरुन नेले. (Pune Crime)

 

त्यानंतर हे चोरटे उंड्रीतील (Undri) अतुरनगर सोसायटीत गेले. तेथील चिली चँग हॉटेलमध्ये शिरले.
तेथील कामगार जितू पदम बहाद्दुर मगर (वय २८) आणि सुरज चंद्रबहाद्दुर छत्री (वय २०) यांना पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्याकडून ८०० रुपये जबरदस्तीने चोरुन नेले. सहायक पोलीस निरीक्षक सुरवसे तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Robbed 2 medical shopkeepers at gunpoint The incident took place in Kondhwa after he broke into a hotel and threatened to kill himself

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा