पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) दौंड शहराजवळ (Daund) असलेल्या लिंगाळी या ठिकाणी शनिवारी (दि.11) मध्यरात्री एक दरोड्याची घटना उघडकीस आली आहे. लिंगाळी (Lingali) येथील एका मेडिकलचं शटर उचकटून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. अवघ्या दोन मिनिटात चोरट्यांनी दुकानातील 1 लाख 45 हजार रुपयांची रोकड लंपास केली. शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास तीन दरोडेखोरांनी हा दरोडा टाकला आहे. चोरीची ही घटना दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाली (Robbery capture in CCTV) आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर पुणे ग्रामीण भागात (Pune Crime) भीतीचे वातावरण पसरलं आहे.
https://twitter.com/MarathiMedium/status/1436969310292004869?s=20
लिंगाळी येथील दौंड महाविद्यालयाच्या (Daund College) मुख्य प्रवेशद्वाराजवळ युनिटी मेडीकेअर (Unity Medicare) नावाचं एक मेडिकल शॉप आहे. या मेडिकलच्या दुकानात शनिवारी पहाटे तीन वाजून पन्नास मिनिटांनी काही चोरट्यांनी दरोडा टाकला. दरोडेखोरांनी मेडिकलचे कुलूप तोडून शटर उचकटून दुकानात प्रवेश केला. अवघ्या दोन मिनिटात दरोडेखोरांनी दुकानातील 1 लाख 45 हजार रुपयांची रोकड लंपास केली.
–
पायी चालत आलेल्या तीन चोरट्यांनी दुकानाच्या शटरचे कुलूप तोडले. यानंतर दोन चोरटे दुकानात शिरले. दुकानाच्या आतील बाजूस काउंटरमधील कुलूपबंद ड्रॉव्हरमध्ये ठेवलेली 1 लाख 45 हजार रुपयाची रोकड त्यांनी चोरुन नेली. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मेडिकलमधील कर्मचाऱ्याने औषध विक्रीतून आलेली सर्व रक्कम एकत्रित दुकानातील ड्रॉव्हरमध्ये ठेवली होती.
याप्रकरणी मेडीकल दुकानाचे मालक दादा भाऊसाहेब लोणकर (Dada Bhausaheb Lonakar) यांनी दौंड पोलीस ठाण्यात (Daund police station) फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे.
सीसीटीव्हीत कैद झालेले चोरटे 22 ते 30 वयोगटातील आहे.
सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला आहे.
Web Titel :- pune crime | robbery at medical shop robbed 1 lakh 45 thausand in just 2 minute in daund pune
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Shivsena | यूपी निवडणूकीत शिवसेना 100 जागा लढणार, संजय राऊत यांची घोषणा
Maharashtra Rains | पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता