पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | दिवसाला 15 हजार रुपये दंड आणि दरमहा 10 टक्के व्याजाने पैसे घेणाऱ्या खासगी सावकाराविरुद्ध गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch) खंडणी विरोधी पथक 2 ने (Anti Extortion Cell) कारवाई केली आहे. प्रसाद किसन कुतळ (Prasad Kisan Kutal) याच्यावर पोलिसांनी लष्कर पोलीस ठाण्यात (Lashkar Police Station) आयपीसी 386, 387, 452, 504 व महाराष्ट्र सावकारी अधिनियमांतर्गत (Maharashtra Moneylending Act) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime)
अर्जदार यांना पैशांची गरज असल्याने त्यांनी प्रसाद कुतळ याच्याकडून 5 लाख रुपये प्रति महीना 10 टक्के व्याजाने (Interest) घेतले होते. त्यांनी कुतळ याला रोख आणि ऑनलाईन स्वरुपात 5 लाख 95 हजार रुपये परत केले होते. परंतु फिर्यादी यांनी वेळेत व्याजाचा हप्ता दिला नाही म्हणून प्रत्येक दिवसाला 15 हजार रुपये दंड (Penalty) असे एकूण 18 लाख 10 हजार रुपयांची मागणी करुन शिविगाळ व दमदाटी केली. (Pune Crime)
याबाबत तक्रारदार यांनी खंडणी विरोधी पथक-2 कडे अर्ज केला होता. या अर्जाची चौकशी करुन खंडणी विरोधी पथकाने अवैध सावकार प्रसाद कुतळ (वय-45 रा. जेधे पार्क हौसींग सोसायटी, रास्ता पेठ) याच्या विरुद्ध लष्कर पोलीस ठाण्यात खंडणी व अवैध सावकरी केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णीक (Jt CP Joint Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 2 नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar) यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक – 2 चे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे (Police Inspector Balaji Pandhare), सहायक पोलीस निरीक्षक चांगदेव सजगणे (API Changdev Sajjanne), पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव (PSI Mohandas Jadhav),
श्रीकांत चव्हाण (PSI Shrikant Chavan), पोलीस अंमलदार विजय गुरव,
प्रदिप शितोळे, शैलेश सुर्वे, विनोद साळुंके, राहुल उत्तरकर, अनिल मेंगडे, संग्राम शिनगारे,
सैदोबा भोजराव, सचिन अहिवळे, अमोल पिलाने, चेतन आपटे, सुरेंद्र साबळे, पवन भोसले,
चेतन शिरोळकर, प्रदिप गाडे व आशा कोळेकर यांनी ही कारवाई केली.
Web Title :- Pune Crime | Rs 15,000 fine per day, action taken by Anti-Extortion Squad-2
against moneylenders charging interest at 10 per cent per month
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Pune Crime | ‘त्या’ तरुणीचा खून एकतर्फी प्रेमातून, खून करणाऱ्या आरोपीची मुळशीत आत्महत्या
- T-20 World Cup | इंग्लंडनं अभ्यास केला सूर्यकुमारचा पेपर आला हार्दिकचा, फलंदाजांचा उतावळेपणा पडला महागात
- Chitra Wagh | ‘एखाद्या महिलेचा अपमान म्हणजे…; भाजपच्या चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंना टोला