Pune Crime | महाराष्ट्र सरकारच्या स्कीममधून जमीन विकत घेऊन देण्याचं दाखवलं आमिष, 28 लाखाच्या फसवणूक प्रकरणी महिला अटकेत

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  महाराष्ट्र सरकारच्या स्कीममधून (Maharashtra Government scheme) जमीन विकत घेऊन देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस (Pune Crime) आला आहे. याप्रकरणी एका महिला आरोपीला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी महिलेने 27 लाख 51 हजार रुपयांची फसवणूक केली. अनिता भिसे (Anita Bhise) असे अटक करण्यात आलेल्या महिला आरोपीचे (Pune Crime) नाव आहे. याप्रकरणी दुर्गेश्वरी चित्तर (Durgeshwari Chittar) (वय-47) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्गेश्वरी यांचा कॉम्प्युटर क्लासेसचा (computer classes) व्यवसाय असून आरोपी आणि त्या एकाच इमारतीत राहतात.
त्यामुळे चित्तर यांची महिला आरोपीसोबत ओळख होती.
आरोपी महिलेने चित्तर यांना उच्च पदस्थ अधिकारी असल्याचे भासवून महाराष्ट्र शासनाच्या योजनेंतर्गत कमी किंमतीत जमीन देण्याचे आमिष दाखवले.

सरकारी योजनेतून जमीन देण्याच्या बहाण्याने अनिता भिसे यांनी चित्तर यांच्याकडून 27 लाख 51 हजार रुपये घेतले.
त्यानंतर आरोपी अनिताने संबंधित रक्कम पुणे कोषागार (Pune Treasury) कार्यालयात जमा केल्याची बनावट पावती, पत्र देऊन चित्तर यांची आर्थिक फसवणूक केली.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले (Hanumant Bhosale) करित आहेत.

Web Title : Pune Crime | Rs 28 lakh looted under Maharashtra government scheme female accused arrested by pune police

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Lok Janshakti Party | लोकजनशक्ती पार्टीचे 23 जुलैला ‘माझे रेशन, माझा अधिकार’ धरणे आंदोलन

Mumbai-Pune Trains | खंडाळा घाटात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने मुंबई-पुणे रेल्वेसेवा ठप्प

Devendra Fadnavis | DGIPR अधिकार्‍यांच्या इस्त्रायल दौरा कशासाठी? फडणवीस म्हणाले…

Beed Suicide | कोल्हापूर येथून बीड जिल्हयात आलेल्या प्रेमी युगलाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रचंड खळबळ