Pune Crime | प्रेमाचे नाटक करत ब्लॅकमेल करुन इस्टेट एजंटाकडून उकळली 43 लाखांची खंडणी; तरुणीला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  – Pune Crime | प्रेमाचे नाटक (Drama Of Love) करुन शारीरीक संबंध ठेवण्याचा प्रयत्न (Trying To Have Physical Relation) करुन त्याद्वारे ब्लॅकमेल (Blackmail) करुन एका इस्टेट एजंटाकडून (Estate Agents Pune) एका तरुणीने 43 लाख रुपयांची खंडणी (Ransom) उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी (Viman Nagar Police) एका तरुणीला अटक केली असून तिची बहीण व मित्रावर गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

याप्रकरणी विमाननगर येथे राहणार्‍या एका ३८ वर्षाच्या इस्टेट एजंट असलेल्या तरुणाने विमानतळ पोलिसांकडे (Viman Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार पूर्वीका सलून आणि विमाननगर येथे 4 सप्टेंबर 2021 ते 30 मार्च 2022 दरम्यान घडला आहे.
वर्षा कोंडीबा जाधव Varsha Kondiba Jadhav (वय 29 ) असे अटक केलेल्या तरुणीचे नाव आहे. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षा जाधव हिचे सलुन आहे. या सलूनमध्ये इस्टेट एजंट असलेल्या फिर्यादी याची ओळख झाली. सुरुवातीला वर्षा जाधव हिने फिर्यादीकडून सलूनच्या कामासाठी 4 लाख रुपये उसने घेतले. त्यानंतर त्याच्याकडे खूप पैसे असल्याची माहिती मिळाल्यावर फिर्यादीसोबत ओळख वाढवली. त्यांना वेगवेगळ्या हॉटेल, कॅफे, पबमध्ये नेऊन जबरदस्तीने संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना ब्लॅकमेल करण्याची धमकी देऊन पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली. फिर्यादी यांनी बदनामीला घाबरुन तिला वेळोवेळी 24 लाख 29 हजार 583 रुपयांचे सोने खंडणी (Extortion Case) स्वरुपात दिले.

 

तसेच ती, तिची बहीण, मित्र यांच्या नावावर वेळोवेळी 19 लाख 55 हजार रुपये रोख असे 43 लाख 84 हजार रुपये दिले. तरीही तिची मागणी संपली नाही. फिर्यादीचे शॉपचे रेंट अ‍ॅग्रीमेट करुन घेतले. तसेच फिर्यादीच्या नावावरील फ्लॅट आपल्या नावावर करुन देण्याची मागणी ती करत होती. तिच्या मागण्या संपत नसल्याने शेवटी या इस्टेट एजंटाने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल करुन या तरुणीला अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक शिवदास लहाने (API Shivdas Lahane) तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime | Rs 43 lakh ransom from estate agent by blackmailing by
pretending to be in love; The young woman was arrested

 

Advt.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा