Pune Crime | पुण्यात लिलाव भिशीच्या नावाखाली महिलेची 60 लाखांची फसवणूक; पती-पत्नीविरुद्ध FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भिशी स्कीम (bhishi) सुरु करुन जास्तीचा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून अनेक स्त्रियांची फसवणूक केल्याचा प्रकार पुण्यातील (Pune Crime) घोरपडी परिसरात घडला आहे. याप्रकरणी एका दाम्पत्यावर मुंढवा पोलीस ठाण्यात (Mundhwa police station) फसवणुकीचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे. आरोपींनी फिर्यादी महिलेची 60 लाखांची फसवणूक (Pune Crime) केली असून त्यांच्यासह इतर 11 ते 12 महिलांची फसवणूक (Cheating) केली आहे. हा प्रकार मार्च 2018 ते 19 ऑक्टोबर 2021 या कालावधीत घडला आहे.

सुजाता चेन्नकेशवल्लु रामगिरी (Sujata Chennakeshavallu Ramgiri) आणि चेन्नकेशवल्लु चेन्नय्या रामगिरी
Chennakesavallu Chennayya Ramgiri (रा. रामनगर, बी.टी. कवडे रोड, घोरपडी) यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा (Pune Crime) दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी 38 वर्षीय महिलेने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद (Pune Crime) दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजाता आणि तिचा पती चेन्नकेशवल्लु यांनी घोरपडी (Ghorpadi) परिसरातील काही महिलांना एकत्रीत करत लिलाव भिशी सुरु केली होती.
सुरुवातीला महिलांना चांगला परतावा दिल्याने फिर्यादी महिलेने आणि त्यांच्या ओळखीच्या इतर 11 ते 12 महिलांनी आरोपींकडे मार्च 2018 मध्ये भिशी लावली होती.
दर महिन्याला 2 लाख 50 हजार रुपये भरुन फिर्यादी यांनी 60 लाख रुपये गुंतवले (Investment) होते. भिशीची मुदत संपल्याने फिर्यादी महिलेने पैशांची मागणी केली.
परंतु आरोपींनी पैसे देण्यास नकार देऊन त्यांची फसवणूक (Pune Crime) केली.
तसेच फिर्यादी यांच्यासह इतर महिलांची देखील त्यांनी फसवणूक (Cheating) केली.
मुंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी
(senior police inspector bramhanand naikwadi) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एच.एस. गिरी (PSI H.S. Giri) पुढील तपास करीत आहेत.

हे देखील वाचा

EPFO | 6.5 कोटी नोकरदारांसाठी मोठी खुशखबर ! अकाऊंटमध्ये ट्रान्सफर झाले PF चे व्याज; ताबडतोब चेक करा किती आले पैसे?

Yes Bank Case | नीरा राडिया यांना 300 कोटींच्या फसवणूकप्रकरणी पोलिसांचे ‘समन्स’

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime | Rs 60 lakh scam in Pune under auction FIR in mundhwa police station against husband and wife

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update