Pune Crime | इंदापूर पंचायत समितीत माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Crime | इंदापूर येथील पंचायत समितीचे (Indapur Panchayat Samiti) गटविकास अधिकारी विजयकुमार परीट (Vijaykumar Parit) यांच्या मनमानी कारभाराविरोधात माहिती अधिकारी कार्यकर्ते (RTI) गोरख खंडागळे, घनशाम निंबाळकर ,विष्णू पिसाळ, दादा पठाण,मधुकर कदम ,हनुमंत बनसोडे, संभाजी खंडागळे आदी आंदोलनाला बसले होते. मात्र प्रशासनाने या आंदोलनाची (agitation) दखल न घेतल्यामुळे सर्वच आंदोलनकर्त्यांनी अंगावर ज्वालाग्राही पदार्थ टाकून आत्मदहन (Pune Crime) करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

 

दरम्यान गटविकास अधिकारी विजयकुमार परीट व माहिती अधिकार कार्यकर्ते तथा क्रांतिसूर्य संघटनेच्या (Krantisurya Sanghatana)
पदाधिकाऱ्यांमध्ये इंदापूर पोलीस ठाण्याचे (Indapur Police Station) पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर (Police Inspector T. Y. Mujawar) यांनी मध्यस्थी करत सुसंवाद घडवून आणला.
यावेळी परीट यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केल्याने वादावर पडदा (Pune Crime) पडला.

 

माहिती अधिकार कार्यकर्ते तथा क्रांतिसूर्य संघटनेचे गोरख खंडागळे, घनशाम निंबाळकर ,विष्णू पिसाळ, दादा पठाण,मधुकर कदम ,हनुमंत बनसोडे,
संभाजी खंडागळे यांनी गटविकास अधिकारी विजकुमार परीट यांचा मनमानी कारभार, आरेरावीची भाषा, पंचायत समितीचे तीन दिवस काम बंद आंदोलन तसेच माहिती अधिकार कार्यकर्त्याना अटक करण्याची धमकी यामुळे आंदोलन व आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.
त्यानुसार 27 ऑक्टोबरला कळंब, वालचंदनगर, रणगांव भागातील कार्यकर्त्यांनी पंचायत समितीत आंदोलन सुरु केले.
दिवसभर आंदोलन सुरु होते पण एकही अधिकारी इकडे फिरकले नाही.
किंबहुना आंदोलनाची दाखल घेतली न गेल्यामुळे आंदोलनकर्त्यांनी ज्वलंत पदार्थ अंगावरओतून आत्मदहन (Pune Crime)
करण्याचा प्रयत्न केला. उपस्थित असलेल्या पोलिसांची तत्काळ आंदोलकांच्या हातातील ज्वलंत पदार्थाचे डबे हातातून हिसकावून घेतल्याने मोठा अनर्थ टळला.

 

Web Title : Pune Crime | RTI activists attempt self immolation in Indapur Panchayat Samiti

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | सराईत वाहनचोर मार्केटयार्ड पोलिसांच्या जाळ्यात, 6 दुचाकी जप्त

Central Government Employee | खुशखबर ! धुमधडाक्यात होणार सरकारी कर्मचार्‍यांची दिवाळी, ‘या’ दिवशी मिळतील बोनससह DA एरियरचे पैसे

Ayodhya Deepotsav 2021 | अयोध्येत पुन्हा होणार दीपोत्सवाचा विक्रम, एकाच वेळी प्रज्वलित होतील 12 लाख दिवे