Pune Crime | अत्यंत दुर्दैवी ! बहिणीच्या आत्महत्येनंतर पत्नीचा खून करणाऱ्या भावाचाही मृत्य; पुणे जिल्ह्यातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | रागाच्या भरात बहिणीने आत्महत्या (Suicide) केल्यानंतर चिडलेल्या भावाने आपल्या पत्नीचा खून (Murder) करून स्वत: आत्महत्येचा प्रयत्न (Attempted suicide) करणाऱ्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू (Death) झाला. ही घटना पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) मांडवगण फराटा येथे गुरुवारी (दि.18) घडली होती. मयत समीर तावरे (Sameer Taware) या आरोपीने बहिणीने आत्महत्या केल्यानंतर पत्नीचा धारदार हत्याराने खून केला होता.

 

शिरुर तालुक्यातील (Shirur taluka) मांडवगण फराटा येथली समीर तावरे याच्या बहिणीने कौटुंबिक वादातून (family dispute) रागाच्या भरात विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. दुसऱ्या दिवशी हा मृतदेह विहिरीत आढळून आला होता. यानंतर समीर याने घरी येऊन पत्नी वैशालीवर धारदार हत्याराने सपासप वार करुन खून केला. यानंतर त्याने स्वत: विषारी औषध प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न (Pune Crime) केला.

 

समीर याच्यावर दौंड येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरु होते.
मात्र, शनिवारी (दि.20) सकाळी त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
समीर याच्या पश्चात मलगा यशवर्धन तावरे (वय-11) शरयु तावरे (वय-7) वृद्ध आई कमल तावरे
आणि वडील भिवाजी तावरे असा परिवार आहे. रागाच्या भरात केलेल्या कृत्यामुळे दोन लहान मुलांना अनाथ होण्याची वेळ आली.

 

Web Title :- Pune Crime | sameer taware who killed his wife and try to die also died unfortunate incident at mandvagan frata daund of pune district

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Preity Zinta | आई बनल्यानंतर अभिनेत्री प्रिती झिंटा करणार बाॅलिवूडमध्ये ‘कमबॅक’; या रोलमध्ये दिसणार

Crime News | धक्कादायक ! पत्नी आणि मेहुण्याच्या त्रासाला कंटाळुन पतीची आत्महत्या; 5 दिवसांपूर्वीच झाले होते लग्न

Syed Mushtaq Ali Trophy | 4 चेंडू 4 विकेट्स; विदर्भच्या दर्शन नळकांडेने केला विक्रम