Pune Crime | हौसेसाठी पिस्तुल बाळगणारे संतोष डिंबळे आणि उमेश वाव्हळ पोलिसांच्या जाळ्यात; खेड शिवापूरला दोघाकडून 2 गावठी पिस्तुल हस्तगत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | सुमारे दीड वर्षापूर्वी खून झालेल्या गुन्हेगाराकडून हौसेपोटी पिस्तुल घेऊन ते राजरोजपणे मिरविणार्‍या दोघे तरुण पुणे ग्रामीण पोलिसांच्या (Pune Rural Police) जाळ्यात अडकले. खेड शिवापूर (Khed Shivapur) येथे आलेल्या दोघांकडून पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या (Pune Rural Police Local Crime Branch) पथकाने 2 गावठी पिस्तुल आणि 4 जीवंत काडतुसे असा 1 लाख रुपयांचा माल जप्त केला आहे. (Pune Crime)

 

संतोष अंकुश डिंबळे Santosh Ankush Dimble (वय 21, रा. टेल्को कॉलनी, दत्तनगर) आणि उमेश दिलीप वाव्हळ Umesh Dilip whaoval (वय 25, रा. बांडेवाडी, खेड शिवापूर, ता. हवेली) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

 

पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथक राजगड पोलीस ठाण्याच्या (Raigad Police Station) हद्दीत गस्त घालत असताना पोलीस अंमलदार प्राण येवले यांनी पुणे-सातारा रोडवरील (Pune-Satara Road) कोंढणपूर चौकातील (Kondhanpur Chowk) महामार्गावरील पुलाखाली दोघे जण थांबल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने तेथे जाऊन दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता दोघांच्या कमरेला प्रत्येकी 1 गावठी पिस्तुल व मॅगझिन व त्यामध्ये प्रत्येकी 2 जिवंत काडतुसे असे 2 पिस्तुले व 4 जिवंत काडतुसे असा 1 लाख 400 रुपयांचा माल मिळून आला.  त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांना ही पिस्तुले प्रविण मोरे Pravin More (रा. शिवरे ता. भोर) याने ठेवायला दिली असल्याचे सांगितले आहे. प्रविण मोरे याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल होता.

 

 

कोरोनामुळे पॅरोलवर तो कारागृहातून बाहेर आल्यावर त्याचा जुलै 2020 मध्ये
चौघांनी कोयत्याने वार करुन खून केला होता. (Pune Crime)

 

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (SP Dr. Abhinav Deshmukh),
पोलीस निरीक्षक अशोक शेळके (Police Inspector Ashok Shelke)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे (PSI Rameshwar Dhongde),
पोलीस अंमलदार प्रकाश वाघमारे, अमोल शेडगे, प्राण येवले या पथकाने ही कामगिरी केली आहे.

 

Web Title :- Pune Crime | Santosh Dimble and Umesh Vavhal, who were carrying pistols for Hausa, were caught by the police; 2 village pistols seized from two at Khed Shivapur pune rural police local crime branch

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा