Pune Crime | सराईत वाहनचोर मार्केटयार्ड पोलिसांच्या जाळ्यात, 6 दुचाकी जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरात (Pune Crime) वाहन चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. मार्केट यार्ड पोलिसांनी (Market Yard police) वाहन चोराला (Vehicle thief) अटक करुन त्याच्याकडून चोरीच्या सहा दुचाकी जप्त (Six stolen bikes seized) केल्या आहे.अभिषेक दशरथ वाघमारे (वय-19 रा. आबीलवाडा कॉलनी, दांडेकर पुल) असे अटक (Pune Crime) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात (Market Yard Police Station) दाखल असलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना तपास पथकातील पोलीस शिपाई स्वप्नील कदम (Swapnil Kadam) आणि अनिस शेख (Anis Sheikh) यांना आरोपीची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपी अभिषेक वाघमारे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेली दुचाकी (एमएच 12 एमएन 5035) बाबत चौकशी केली असता त्याने गाडी चोरीची असल्याची माहिती (Pune Crime) दिली. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता आणखी 5 दुचाकी मिळून आल्या. पुढील तपास पोलीस नाईक किरण जाधव करीत आहेत.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण (Additional Commissioner of Police Namdev Chavan), परिमंडळ 5 चे पोलीस उपायुक्त नम्रता पाटील (DCP Namrata Patil),
सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे (ACP Rajendra Galande) यांच्या मार्गदर्शनाखीली मार्केट यार्ड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए.व्ही. देशपांडे (Senior Police Inspector A.V. Deshpande),
पोलीस निरीक्षक (गुन्हे) सविता ढमढेरे (Police Inspector Savita Dhamdhere) यांच्या सुचनेप्रमाणे
तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक कदम, पोलीस हवालदार हिरवाळे, किरण जाधव, अनिस शेख, मुसळे, पाटील, पोळेकर, कदम, घुले यांच्या पथकाने केली.

हे देखील वाचा

PM Kisan | शेतकर्‍यांसाठी महत्वाची बातमी ! 4 दिवसांच्या आत जमा करा ‘ही’ कागदपत्रं, अकाऊंटमध्ये येतील 4000

Ayodhya Deepotsav 2021 | अयोध्येत पुन्हा होणार दीपोत्सवाचा विक्रम, एकाच वेळी प्रज्वलित होतील 12 लाख दिवे

Shiv Sena | ‘महाराष्ट्रातील भाजप हे अजब रसायन; रेटून खोटं बोलण्याची हिंमत व आत्मविश्वास त्यातून येतो’ – शिवसेनेचा हल्लाबोल

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime | Sarait vehicle thief Marketyard police nab, 6 bikes seized

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update