Pune Crime | चिंचवड येथे चारित्र्याच्या संशयावरून पत्नी, सासूवर सत्तुरने वार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | चिंचवड येथील (Chinchwad News) वाल्हेकरवाडी परिसरातील एकाने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर तसेच सासूवर देखील सत्तूरने वार केले (Pune Crime) आहे. या हल्ल्यात दोघी गंभीर जखमी (Seriously injured) झाल्या आहेत. याप्रकरणी सुभाष नामदेव गायकवाड (Subhash Namdev Gaikwad) (वय 40, रा. नाव्हरे, ता. शिरुर, जि. पुणे) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून सत्तूर जप्त केला. त्याच्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

ही घटना काल (सोमवारी) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली आहे. रुपाली सुभाष गायकवाड (Rupali Subhash Gaikwad) आणि मंगल दळवी (Mangal Dalvi) असे गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. दरम्यान याप्रकरणी दीपमाला लक्ष्मण कोर्टेकर (Deepmala Laxman Kortekar) (वय 39, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी याप्रकरणी सोमवारी चिंचवड पोलीस ठाण्यात (Chinchwad Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

याबाबत माहिती अशी की, फिर्यादी यांची बहीण रुपाली आणि आरोपी सुभाष गायकवाड हे पती – पत्नी आहेत. तसेच जखमी झालेल्या मंगल दळवी या फिर्यादी आणि रुपाली यांच्या आई आहेत. आरोपीने पत्नी रुपाली हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला जिवे मारण्याच्या उद्देशाने तिच्या डोक्यात सत्तूराने वार करून गंभीर जखमी केले. त्यावेळी मंगल दळवी या रुपाली हिला सोडविण्यासाठी गेल्या असता आरोपीने तिलाही जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने तिच्याही डोक्यात व हातावर वार करून गंभीर जखमी केले. असे फिर्यादीत म्हटलं आहे.

 

दरम्यान, या घटनेनंतर जखमी रुपाली आणि त्यांच्या आई मंगल दळवी यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
यानंतर दीपमाला कार्टेकर यांनी फिर्याद दिली.
आरोपीवर पोलिसांनी गुन्हा (FIR) दाखल करून त्याला ताब्यात (Arrested) घेण्यात आले आहे.
याप्रकरणी अधिक तपास चिंचवड पोलीस करीत आहेत.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | sattur stabs wife mother in law on suspicion of character crime news

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा